Nanded Godavari Urban Bank honored National Award  sakal
नांदेड

नांदेड : गोदावरी अर्बन बॅंक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बॅंकेचे संचालक धनंजय तांबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार क्षेत्राला बळकट करणाऱ्या गोदावरी अर्बनला चेंबर ऑफ इंडिया सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थेच्या वतीने सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल बेस्ट को - ऑप सोसायटी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराने गोदावरी अर्बनच्या नावलौकिकात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, जनपथ, दिल्ली येथे झालेल्या समारंभात करण्यात आले. यावेळी चेंबर ऑफ इंडियन सूक्ष्म लघु मध्यम उद्योग संस्थेचे अध्यक्ष मुकेश मोहन गुप्ता, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा यांची उपस्थिती होती. चेंबर ऑफ इंडियन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग संस्था अर्थात भारतातील व्यापार आणि वाणिज्यला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी प्रचलित आहे.

मागील अनेक वर्षांपासून गोदावरी अर्बन ही संस्था महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलगांणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात काम करीत आहे. संस्थेने आपल्या सर्वच शाखा सुसज्ज व संगणकीकृत केल्या असून ग्राहकांना आरटीजीस, एनएफटी, मोबाईल बँकिंग, एटीम, क्यूआर कोड अशा सर्व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयी आपल्या ग्राहकांना देत आहे. सर्वच शाखांमध्ये उच्च विद्याविभूषित अधिकारी, कर्मचारी वृंद ग्राहकांना आपली सेवा देण्यास सदैव तत्पर असतात. गोदावरी अर्बनला केंद्र स्तरावरील बेस्ट को -ऑप सोसायटी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार हेमंत पाटील, अध्यक्षा राजश्री पाटील व संचालक मंडळांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT