file photo 
नांदेड

Nanded : ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा पिके धोक्यात

कीटकनाशक फवारणीच्या खर्चामध्ये झाली वाढ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यातील शेतकरी आधीच यंदा झालेल्या अतिवृष्टीतून सावरत रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. खरीप हंगामातील तूर पीक कसेतरी वाचविले असता हे पीक घरी येईल, या आशेवर आस लावून शेतकरी होते. मात्र गत दोन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

खरीप हंगामातील सर्वच पिकांचा नायनाट झाला. प्रमाणापेक्षा जास्त पडलेल्या पावसाने खरिपातील कापूस, सोयाबीन, कडधान्यासह कपाशीतील मिश्र पिकांची नासाडी झाली. तरीही शेतकऱ्याने हार न मानता नव्याने रब्बी पिकासाठी आपले कंबरडे कसून पिकांच्या पेरणीची तयारी केली. परंतु, तूर पीक ऐन फुलोऱ्यावर असताना तीन ते चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुन्हा शेतकऱ्यांची चिंती वाढवत आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शेतकरी म्हणतात

फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यास पैशांअभावी पुन्हा अडचण येणार आहे. खरीप हंगामातील जास्त पावसाने सर्वच पिकांचा नायनाट केला. सरकारची नुकसान भरपाई ही पेरणीला देखील पुरली नाही. त्यामुळे सर्वच शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

- रावसाहेब गावंडे, शेतकरी

ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे नेमके पीक तरी कोणतं घ्यावं ही समस्या सर्वच शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

- वामनराव गोराडे पाटील, शेतकरी

ढगाळ वातावरणामुळे तूर, हरभरा, कापूस, कांदा, भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे शेतातील तूर पिकावर दव जात असून, उभे पीक वाळल्यागत झाले आहे.

- सुलोचनाबाई पाथरडकर, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

SCROLL FOR NEXT