हाणामारी sakal
नांदेड

Nanded : पिंपळगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी

हाणामारीत अनेकजण जखमी कडक पोलिस बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा

नायगाव : पिंपळगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीत कुरघोडीच्या राजकारणाने मतदानाच्या पुर्वसंध्येला गंभीर वळण घेतल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात विद्यमान सरपंचासह अनेकजन जखमी झाले आहेत. चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. काल मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तालुक्यातील आठ ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असल्या तरी पिंपळगाव येथे दोन्ही गटाने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अटीतटीची व लक्षवेधी ठरली होती. दोन्ही गटांनी आपापल्या विजयाचे दावे करण्याबरोबरच एक-दुसऱ्यावर टिकाटिपण्णी व उणेदुणे काढत असल्याने मागच्या आठ ते दहा दिवसापासूनच गावातील तणावपूर्ण वातावरणात झाले होते. पण स्थानिक पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे मतदानाच्या पुर्वसंध्येला शनिवारी रात्री ७ ते ७.३० च्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

या हाणामारीत विद्यमान सरपंच किरण कदम यांच्यासह रावसाहेब मसाजी कदम व आनंदा मसाजी कदम यांना गंभीर दुखापत झाली तर ही परिस्थिती पाहुन रक्तदाब वाढल्याने संजय किशन कदम यांचीही तब्येत बिघडल्यामुळे चौघांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. झालेल्या हाणामारीत अनेकजण जखमी झाले, पण या प्रकरणी कुणीही पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही. जखमींना तातडीने नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हाणामारीच्या घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी शनिवारी रात्री उशिरा पिंपळगावला भेट दिली आणि पोलिसांना योग्य त्या सुचना दिल्या. तर प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सांगळे हे पिंपळगाव येथेच तळ ठोकून होते. मतदानाच्या दिवशी काहीही गोंधळ होवू नये यासाठी स्थानिक पोलिस यंत्रणेसह राज्य राखीव दल, क्युआरटी टीम आणि होमगार्ड तैनात करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganpati Sansthan : सांगली संस्थानचा वाद चव्हाट्यावर! 'युवराज आदित्यराजे हेच कायदेशीर वारस,'; विजयसिंहराजेंची स्पष्टोक्ती, भाग्यश्री यांनी गुरुजींची माफी मागावी

Asian Games: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडलसाठी सज्ज! भारतीय हॉकी संघ ऑलिंपिक पात्रतेसाठीही प्रयत्न करणार; पाहा Schedule

Moon Discovery: चंद्रावर सापडले प्रचंड विवर! ७२८ फूट रुंद, १४१ फूट खोल; दोन वर्षांपूर्वीच्या उल्कापाताचा थरारक पुरावा

Marathi News Live Updates : आमच्या विरोधात कटकारस्थान, या मागे नेपाळी कनेक्शन; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

SCROLL FOR NEXT