file photo 
नांदेड

नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत वाड्याला आले महत्त्व ; एका एका मतांची होतीय जुळवा जुळव

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : ग्रामपंचायत निवडणूक ही जितकी सोपी आहे तेव्हढीच ती अवघड आहे. वार्डातील मतदारांची संख्या कमी असल्यामुळे एक एक मत महत्वाचे ठरते. तसेच गावाच्या व आणि भावकीच्या विरूद्ध जावू नये असे म्हंटले जाते. जेंव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भावकीला व वाड्याला विशेष महत्त्व येत. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वाड्याला व खुटाला विशेष महत्व आले असून ज्यांचा वाडा व खुट मोठे त्या उमेदवाराचा विजय होण्यास मदत होते असे अनेकदा निवडणूकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन, तिन पॅनलमध्ये होत असून ग्रामीण भागातील राजकारण थंडीमध्ये वातावरण गरम होत आहे. प्रत्येक पॅनलमध्ये एक एक मतासाठी चढाओढ लागली आहे.

ग्रामीण भागातील निवडणुका वाडा, भावकी, आडनाव, खूंट यांच्या भोवती फिरत असते. तसेच जात हा महत्वाचा घटक असतो .पण काही गावात एकाच जातीचे प्राबल्य असते. अशावेळी वाड्याला विशेष महत्त्व येते. आपला वाडा कसा मजबूत राहील यासाठी विशेष  प्रयत्न केले जातात. तसेच भावकीला एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवार हे, भावकीतील व जवळचे नातेवाईक निवडणुक लढत असल्यामुळे मतदारांसमोर धर्मसंकट निर्माण होते. तसेच दुरावा निर्माण होतो. हा दुरावा काही प्रसंगी दिर्घकाळ ठरतो. त्यामुळे आम्हाला भावकीच्या व वाड्याविरूद्ध जात येत नाही, भावकीच्या उमेदवारांसोबत रहावे लागते असे सांगून मतदार वेळ मारून नेतात. ग्रामपंचायत निवडणुक जशी जशी जवळ येईल तसे तसे वातारणात थंडीत गरम होणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या वाड्याची चिरेबंदी भिंत कशी भक्कम राहीला यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT