Nanded gram purchase Online registration deadline extend farmers Demand sakal
नांदेड

नांदेड : हरभरा खरेदीची ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवून द्यावी

किनवट, माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

माहूर : राज्यात मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांच्या पिकाचे उत्पादन देखील चांगल्या प्रकारे झाले तरी राज्य शासनाने शेतक-यांना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, या उद्देशाने रब्बी हंगामातील हरभरा या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया विविध संस्था व शासकीय यंत्रणे मार्फत सुरु केली आहे. ज्यामध्ये ता. १६ फेब्रुवारीपासून हरभरा या पिकाची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली तर प्रत्यक्ष खरेदी ही ता. एक मार्चपासून सुरु करण्यात आली. परंतु सहकार व पणनमंत्री यांच्या दालनात झालेल्या ता. ११ मे रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार ता. १७ मेपासून ऑनलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. तर ता. २९ मे रोजी प्रत्यक्ष खरेदी बंद करण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, या निर्णयामुळे ऐन पावसाळ्याच्या व पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या समुहाने व किनवट माहुर तालुक्यात कार्यरत असलेल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी तथा ज्याव्दारे शेतक-यांचे पिक खरेदी केले जात आहे अशा नाफेडच्या प्रतिनिधींनी रब्बी हंगामासाठी हरभरा पिक खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवुन देण्याची मागणी केली आहे.

शेतक-यांची अडचण पाहता या ऑनलाइन नोंदणीच्या मुदतवाढीसाठी विविध शेतक-यांच्या समुहाने हिंगोली लोकसभा क्षेत्राचे खासदार हेमंत पाटील यांच्याकडे देखील मुदत वाढवून देण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती एका निवेदनाव्दारे केली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस, प्रचंड उष्णता, मजुरांची कमतरता यामुळे शेतक-यांना आपले शेतातील पिक योग्य वेळी खरेदी केंद्रावर नेता आले नाही तर यात ऑनलाइनच्या फे-यामुळे निरक्षर शेतक-यांना योग्य वेळी ऑनलाइन नोंदणी करणे शक्य झाले नाही, परंतु आता राज्याच्या पणन व सहकारमंत्र्याच्या आदेशामुळे शेतकरी हतबल झाले असून रब्बी हंगाम २०२१ - २२ साठी हरभरा खरेदीची ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवून देण्याची मागणी किनवट माहुर तालुक्यातील शेतक-यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT