file photo 
नांदेड

नांदेड : प्रेमात अडथळा ठरणाऱ्या दिव्यांग पतीचा प्रियकराकडून खून; तिघांना अटक 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका दिव्यांग व्यक्तीचा खून करणाऱ्या तिघांना इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच काही तासाच्या आत इतवारा पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपी हे विधीसंघर्षग्रस्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरचा मृतदेह ता. 14 फेब्रुवारी ते ता. 18 फेब्रुवारीपर्यंत वाजेगाव परिसरात असलेल्या पुलाखाली पडून होता. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नांदेड ग्रामीण पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे देण्यात आला होता. या संदर्भाने इतवारा पोलिस ठाण्यात मिसिंग ता. 17 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या मयत व्यक्तीचे नाव सय्यद मनसब सय्यद मुमताजअली ( वय 42) वर्ष राहणार गणीपुरा नांदेड असे होते. नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सय्यद मनसबच्या घरी भेट देऊन विचारणा केली होती.

इतवारा उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या सहकारी पोलिसांना या कामासाठी जबाबदारी दिली. त्यात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे न त्यांचे पथकातील पोलिसांनी नांदेड सायबर सेलच्या माध्यमातून तपास सुरु केला. मनसब हा दिव्यांग झाल्यानंतर त्याची पत्नी हैदराबाद येथे राहत होती. तिथे मुळचा गणीपुरा नांदेड येथील 25 वर्षीय युवकासोबत सूत जमविले. पत्नीचे आजचे वय 40 वर्षे असेल.

सदरील युवक आणि मनसबची पत्नी यांना लग्न करायचे होते. पण अडचण होता मनसब. त्याचा काटा काढण्यासाठी सदरचा युवक ता. 11 फेब्रुवारी रोजी नांदेडला आला. नियोजन करुन त्यांनी आपल्या दोन साथीदारांसह ता. 14 फेब्रुवारी रोजी एका ऑटोमध्ये बसवून शहरातून काही भागात फिरवत दारु पाजली आणि बोंढार पुलाखाली रात्री दहा ते अकरा या वेळेत नेले. तिथे चाकूने भोसकून त्याचा खून केला आणि त्याचे प्रेत पुलाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून निघून गेले.

या प्रकरणाच्या आधारावर इतवारा पोलिस काही जणांची तपासणी करत होते. या सर्व प्रकरणाची हाताळणी करणारे डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या निदर्शनास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तपास सुरु केला. तिकडे नांदेड ग्रामिणचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शाखाली शेख असद हेही तपास करत होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेला अॅटोसुद्धा जप्त केला. यातील एकाला पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

पथकातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकाी सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे आणि अशोक घोरबांड यांनी कौतुक केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

SCROLL FOR NEXT