national flag Tiranga Sakal
नांदेड

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन

शंभर भारतीय ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्‍घाटन नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांच्या हस्ते झाले.

यावेळी त्यांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ज्यामुळे नांदेड जिल्ह्याचा नावलौकीक होईल. तसेच याबाबतची नोंद https://harghartirangananded.in या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी शंभर भारतीय ध्वज देणगी स्वरुपात वितरणासाठी उपलब्ध करुन दिले.

यावेळी कार्यालयात अनुज्ञप्ती व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये ध्वज वाटप करण्यात आले. विक्रीसाठी ध्वज प्रादेशिक परिवहन कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळ नांदेडचे सावित्री महिला लोक संचलित साधन केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT