Nanded Heavy Rain flood crop damage 
नांदेड

Nanded Heavy Rain : अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे, रस्त्यांचे नुकसान

मारतळ्यासह परिसरातील स्थिती; अनेकांची शेती खरडली, पूल खचले, घरे पडली

सकाळ वृत्तसेवा

मारतळा - जिल्ह्यासह लोहा तालुक्यातील मारतळा व परिसरात मागील आठवड्यात दोनदा झालेल्या अतिवृष्टीने व आलेल्या पुरामुळे अनेकांची शेती खरडून व सखल भागातील पिकात पाणी साचून मोठे नुकसान झाले. सर्वाधिक रस्त्यांचे नुकसान झाले असून त्यात वाळकी (खुर्द), धनंज बुद्रुक व हिंदोळा पुल पुरामुळे एका बाजूस मोठे मोठे खड्डे तर उमरा व परसराम तांडा येथील पूल वाहून गेल्याने अजूनही वाहतूक ठप्पच आहे. सुगाव, कापसी, उमरा येथील घरांची मोठी पडझड झाली. त्याला आठवडा उलटूनही अद्याप प्रशासनाकडून पंचनामाचे सोपस्कारच सुरू आहेत.

लोहा तालुक्यातील सहाही मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात सर्वाधिक विक्रमी पाऊस कापसी मंडळात झाला होता. सहा दिवसातच दोनदा अतिवृष्टी झाल्याने परिसरात पुर परिस्थितीने नदी नाल्यांना पूर येऊन जमिनी खरडून गेल्या व सखल भागातील शेतातील पिकात पाणी साचून कोवळ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तर संततधार पावसामुळे वाळकी (खुर्द) व धनंज गावालगाच्या फुलाची कमी उंची असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहू लागले. तसेच सुगाव, कापसी - हिंदोळा पुलावर खड्डे व पुराच्या पाण्यामुळे पुल खचला असून धोकादायक बनला आहे. तर उमरा - परसराम तांडा मधील पूल वाहून गेल्यामुळे येथील वाहतूक अद्यापही ठप्पच आहे.

अतिवृष्टीमुळे सुगावला दोन, कापसीला सात तर उमरा येथील १३ घरांची पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. मात्र प्रशासनाकडून शेती व घराच्या पडझडीचे पंचनामाचे सोपस्कार अद्यापही सुरूच असून, या नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा आहे. रस्त्याबाबतही प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

कॅनॉल फुटून पुराचे पाणी शेतात

संततधार पावसामुळे मारतळा, उमरा व नांदगाव शिवारात कॅनॉल फुटून पुराचे पाणी शेतात गेल्याने अनेकांच्या जमिनीत खरडून नुकसान, तर नांदगाव शिवारात एक जुनी विहीर खचून बुजल्याचे शेतकरी संभाजी वरडोळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

IND vs AFG: थांब आधी तुझे केस नीट करू... वैभव सूर्यवंशीचा मालिका विजयानंतर अभिषेक शर्मासोबत Bromance; Viral Video

Primary Teachers: पोर्टल, प्रशिक्षण, सर्वेक्षण अन् समित्या; शिक्षकांच्या ७२ कामांची यादी पाहून अध्यापनाचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : शरद पवारांच्या पत्रानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; १७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मंत्र्यांचे निर्देश

Santosh Pandit Latest News : संतोष पंडित पुन्हा व्हिडिओ करणार? जामिनावर बाहेर येताच दिला थेट इशारा; ‘मी थांबणार नाही’

SCROLL FOR NEXT