Nanded Sakal
नांदेड

Nanded : जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान; ज्वारी, उडीद, मुगाचा पेरा घटला

जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपातील पेरण्यांना प्रारंभ झाला.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यात खरीप हंगामात मंगळवारपर्यंत (ता. २६) सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार सात लाख सहा हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वाधिक चार लाख हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

मात्र, यंदा सुरवातीला पाऊस लांबल्याने उडीद तसेच मुगाचा पेरा घटला आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे अनेक शेतातील पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आले असून पिके पाण्याखाली तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपातील पेरण्यांना प्रारंभ झाला. परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठराविक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी - अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली. जिल्ह्यात जुलैमधील पावसामुळे खरिपातील पेरण्यांची वेग घेतला.

यंदा उडीद तसेच मुगाचा पेरा घटल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली. बुधवारपर्यंत (ता. २६) जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार सात लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ११६ टक्क्यांनुसार चार लाख हेक्टरवर सोयाबीन तर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ८० टक्के नुसार एक लाख ९४ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९२ टक्क्यांनुसार ६२ हजार हेक्टरवर तूर, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४८.२० टक्क्यांनुसार १३ हजार हेक्टरवर मूग, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४२.५३ टक्क्यांनुसार १२ हजार हेक्टरवर उडीद, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या २१.१३ टक्क्यांनुसार साडेनऊ हजार हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली आहे.

जिल्ह्यात झालेली पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

सोयाबीन - ३,५३,३१४ ४,११,६२० ११६.५०

कपाशी - २,४१,२८२ १,९४,५१७ ८०.६२

तूर - ६७,४२३ ६२,१३१ ९२.१५

ज्वारी - ४४,७४० ९,४५४ २१.१३

उडीद - २९,६२५ १२,५९९ ४२.५३

मूग - २७,३९२ १३,३६६ ४८.८०

मका - ८२३ ७८४ ९५.२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

Prakash Ambedkar : संविधान अन् युद्धाचे संकट टाळण्यासाठी भाजपला हरवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

नैतिकतेला तडा! बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी आता भाजपचा स्वीकृत नगरसेवक, जनतेचा संताप उसळला...

SCROLL FOR NEXT