Nanded Hivalani water scarcity for four days sakal
नांदेड

नांदेड : हिवळणीला चार दिवसांपासून निर्जळी!

ग्रामस्थांचे हाल; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

माहूर : तालुक्यातील ग्रामपंचायत हिवळणी येथील पाणीपुरवठ्याचे काम करणा-या कर्मचा-यांचा मागील अनेक महिन्याचा पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंदचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण हिवळणी गाव त्रस्त झाले असून मागील चार दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने महिला व गावकऱ्यांची पाण्याअभावी हेळसांड होत आहे.

हिवळणी - पापलवाडी या गट ग्राम पंचायतीतंर्गत हिवळणी येथील नळाला पाणी सोडणा-या दोन कर्मचाऱ्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे गावात मागील चार दिवसांपासून निर्जळी आहे. वेतनासाठी वारंवार ग्रामपंचायत व ग्रामसेवकास मागणी करूनही केलेल्या कामाचे वेतन मिळत नसल्याने काम बंदचा पवित्रा कर्मचा-यांनी घेतला आहे. याचा फटका ग्रामस्थांना बसला असून महिला, पुरूषांना दोन दोन किलोमिटर वरून पायपीट करावी लागत आहे.

विशेष म्हणजे पापलवाडी-हिवळणी या गट ग्रामपंचायत असलेल्या दोन्ही गावात स्वतंत्र नळयोजना अस्तित्वात आहेत. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहीरीला देखील पाणी आहे. याबाबत गावातील अरविंद राठोड, मनिष जाधव, मनोहर आडे, राजू पवार, अविनाश जाधव, भिकू राठोड, अभिजित राठोड व अरविंद राठोड आदींनी शनिवारी सकाळी ग्रामसेवक पेंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेवून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अंदाजे दीड लाख रुपये पगार दिला गेला नसल्यामुळे काम बंद करून हिवळणी गावाला पाणीपुरवठा करणे थांबविले आहे. ग्रामपंचायतच्या खात्यात शिल्लक निधी नसल्यामुळे पगार करता येणे कठीण बनले आहे. मागील महिनाभरापासून कर वसुलीसाठी गावकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे. आज झालेल्या चर्चेअंती कर्मचाऱ्यांना पुढील चार ते पाच दिवसात पर्यायी मार्गाने पगार देण्यात येईल. संध्याकाळपासून गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.

- ए. एच. पेंडकर, ग्रामसेवक, हिवळणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT