नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाही गैरफायदा घेत मुदखेड तालुक्यातील अनेक वाळू घाटावरुन गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन सुरुच आहे. पथकाने कारवाई करुन सहा तराफे जाळले.
मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ब्राह्मणवाडा परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दहा ठिकाणी अवैध वाळू उत्खनन घाट चालू झाले आहेत. सध्याचे मंडळ अधिकारी यांनी बुधवारी (ता. ३०) डिसेंबर रोजी दहापैकी एका घाटावर चालू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणारे सहा तराफे पकडून जाळण्याची कारवाई केली.
हेही वाचा - नांदेड : अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाई, सहा लाखाचा मुद्देेमाल जप्त- निलेश सांगडे -
सध्या महसूल प्रशासन ग्रामपंचायत निवडणुकीत व्यस्त आहे. याचा गैरफायदा घेत ब्राह्मणवाडा गावातून हिराघाट, भवानी मंदिर येथे आठ वाळू उत्खनन करण्यासाठी चोरीचे घाट तयार करण्यात आले आहेत. त्रिकूट गणपती, वाडी, बोंढार, नागापूर आणि वांगी यासह अन्य ठिकाणी दिवस- रात्र वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. ब्राह्मणवाडा येथे ता. ३० डिसेंबर रोजी गोरगरीब मजूरदार हे घरकुलासाठी गोदावरी नदी पात्रातून वाळू काढत होते. त्या ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कारवाई करुन सहा तराफे पकडून जाळण्याची कारवाई केली. परंतु बाकीच्या ठिकाणी अवैध वाळू उत्खनन करणार्यावर मात्र कारवाई झाली नसल्याचे ब्राह्मणवाडा येथील नागरिक सांगत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.