file photo 
नांदेड

नांदेड : जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढल्या, मात्र सापाला मारु नका सर्पमित्रांचे आवाहन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात विषारी व बिनविषारी सापाने चावा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. विषारी सापाने चावा घेतल्याने अनेकांचा मृत्यूही झाला आहे. आपल्या परिसरात बिनविषारी सापांची संख्या अधिक जरी असली तरी त्यावर पर्याय म्हणून सावधगिरी बाळगणे हा उपाय आहे. आपल्या परिसरात साप आढळल्यास त्याला मारु नका जवळच्या सर्पमित्रांना बोलावून घ्या असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे. मात्र जिल्ह्यात जवळपास वर्षभरात साडेआठशे सापानेचावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. 

शहर व जिल्ह्यात सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातून अनेक वेळा सर्पदंशाच्या घटनाही घडतात. मानवी वस्तीत साप आढळल्यानंतर सर्रासपणे त्याला मारले जाते. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सर्पदंशाच्या तब्बल साडेआठशे घटना घडल्या आहेत. वेळेवर औषधोपचार न मिळाल्याने यातील अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. भारतात आढळणाऱ्या विषारी सापांच्या बावन जातींपैकी मानवी वस्तीजवळ आढळून येणाऱ्या सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चार जातीचे विषारी साप आहेत. 

तसेच मांजऱ्या, हरणटोळ हे बिनविषारी साप आहेत. तर बिनविषारीमध्ये धामण, धूळ नागिन, डुरक्या फांदीवरील कवड्या, कुक्री, तस्कर, नानेटी या जातीचे सापसुद्धा या परिसरात आढळून येतात. परंतु आढळणाऱ्या प्रत्येक सापापासून धोका असल्याची समजूत करुन प्रत्येकाला मारण्यात येते. ग्रामीण भागात अनेकवेळा वेळेवर औषध उपलब्ध होत नाहीत. उपचारास विलंब होतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असल्याचे पहावयास मिळते. 

सर्पदंश झाल्यास काय काळजी घ्यावी

साप चावल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी. त्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. विषारी साप पायाला चावला असेल तर मांडीला दोरीने आवळून बांधावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारु पाजू नये. यावर पट्टी बांधताना दंड व दोरीमध्ये काडी किंवा बोट टाकून बांधावे. दवाखान्यात जाताना शक्यतो फोन वरुन डॉक्टरांना अगोदर माहिती द्यावी असे माहिती सर्पमित्र प्रसाद शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात आढळणारे साप जिल्ह्यात साधारणपणे चार प्रकारचे विषारी साप आढळतात. त्यामध्ये मण्यार, घोणस आणि फुरसे हे आहे तर जवळपास वीस प्रकारचे बिनविषारी साप आढळतात. घरात सापडल्यानंतर घाबरुन जाऊ नका. त्याला मारु नका, लगेच सर्पमित्राला कळवा. सर्पमित्र येईपर्यंत कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षित अंतरावरुन त्यावर लक्ष ठेवावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT