Nanded Sakal
नांदेड

Nanded : मूर्तिजापुरातील अवैध कत्तलखाना उद्‍ध्वस्त; १९० किलो मांस जप्त, पाच जणांना अटक

कसाबपुऱ्यातील कमील्यात गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

सकाळ डिजिटल टीम

मूर्तिजापूर - शहर पोलिसांनी कसाबपुऱ्यात ‘सर्जीकल स्ट्राईक’ सदृश्य कारवाईत गोवंशाचे १९० किलो मांस जप्त केले व ५ जणांना ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या या शहरातील पहिल्याच कारवाईत अवैध कत्तलखाना पोलिसांनी उद्‍ध्वस्त केल्याची शहरात चर्चा आहे.

मूर्तिजापूर शहर पोलिसांनी ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या उण्या-पुऱ्या पाऊण महिन्याच्या कारकिर्दीत अवैध गोवंश वाहून नेणाऱ्यांवर आठ वेळा कारवाई करून शेकडो गोवंशांचे प्राण वाचविले आहेत. आपल्या हद्दीतील या प्रकाराच्या मुळावरच घाव घालावा,

या विचारात असणारे ठाणेदार भाऊराव घुगे यांना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता गोवंशाची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. लगेच तीन अधिकारी, महिला पोलिसांसह १७ जणांचा ताफा सोबत घेतला. सुक्ष्म नियोजन केले.

परीणामांचा अदमास घेऊन पंच, शेतकरी, छायाचित्रकारास सोबत घेऊन ६ वाजता कसाबपुऱ्यात धाव घेतली.

कसाबपुऱ्यातील कमील्यात गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी पाठविलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सर्व साहित्य विनाविलंब घटनास्थळावरून हलविण्यात आले.

३८ हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीचे १९० किलो मांस, ८०० रुपये किंमतीच्या दोन कुऱ्हाडी व तीन चाकू असे ३८ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त केले.

घटनास्थळावरून जप्त केलेली गोवंशाच्या मांसासह सर्व सामग्री न्यायालयाच्या आदेशानुसार नष्ट केले जाईल. गोवंश गहाळ होत असल्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी व सूचनांमुळे आम्ही सतर्क आहोतच. असा कुठलाही अवैध प्रकार कुठे निदर्शनास आला, तर नागरिकांनी पोलिसांना कॉल करावा किंवा संपर्क साधावा.

- भाऊराव घुगे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस स्टेशन, मूर्तिजापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT