file photo 
नांदेड

नांदेड : न्यायाधीशांचा अंगरक्षक अपघातात ठार, पोलिस दलात हळहळ

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांचा अंगरक्षक अपघातात ठार झाल्याची घटना नांदेड ते सिडको रस्त्यावर मातोश्री मंगलकार्यलयासमोर मंगळवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिस दलात हळहळ व्यक्त होत होती. 

पोलिस मुख्यालयातील व सध्या जिल्हा न्यायालयातील जिल्हा तदर्थ न्यायाधीश (दुसरे) यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. ते आपले कर्तव्य बजावून रात्री दुचाकी (एमएच२६-२४९९) वरुन सिडकोकडे जात होते. त्यांची दुचाकी ही रात्री साडेआठच्या सुमारास नांदेड ते सिडको रस्त्यावर असलेल्या मातोश्री मंगलकार्यालयाजवळ जाताच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रक्तश्राव झाल्याने ते बेसुद्ध पडले. लगेच काही नागरिकांनी त्यांना विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रानी जाहीर केले. 

पोलिस शिपाई विद्याधन एकनाथ ढेंबरे (वय ३५) हा २०१० मध्ये पोलिस दलात रुजु झाला होता. त्याने यापूर्वी कंधार पोलिस ठाण्यात सेवा केली होती. मागील दीड वर्षांपूर्वी त्यांची बदली पोलिस मुख्यालयात झाली. तेंव्हापासून ते जिल्हा न्यायाधीश (दुसरे) यांच्याकडे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते आपल्या दुचाकीरुन जात असताना हा अपघात घडला होता. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व अशी विद्याधन ढेंबरे यांची ख्याती होती. या प्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून नेमका अपघात कसा झाला याचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

High Court on TET : अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी बंधनकारक नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण, शिक्षकांना दिलासा

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : भांडुपमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये एका कर्मचाऱ्याचा 19 वर्षाच्या मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT