file photo
file photo 
नांदेड

नांदेड : हिमायतनगर व नायगाव नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत 27 नोव्हेंबरला  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्‍हयातील नगरपंचायत हिमायतनगर सार्वत्रिक निवडणूक-2021 साठी मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांनी दिनांक 29 ऑक्टोबर,2020 अन्‍वये नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

त्‍यानुसार आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्‍या क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जातीमधील महिला, अनुसूचित जमातीमधील महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरीता सोडत उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शुक्रवार 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय हिमायतनगर येथे आयोजित करण्‍यात आली आहे. हिमायतनगर नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

नायगाव नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत 27 नोव्हेंबरला  

नांदेड : नांदेड जिल्‍हयातील नगरपंचायत नायगाव सार्वत्रिक निवडणूक-2021 साठी मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांनी 29 ऑक्टोबर 2020 अन्‍वये नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.

त्‍यानुसार आयोगाने ठरवून दिलेल्‍या आरक्षणाच्‍या प्रमाणानूसार नायगाव नगरपंचायतीच्‍या क्षेत्रातील एकूण प्रभागापैकी अनुसूचित जातीमधील महिला, अनुसूचित जमातीमधील महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरीता सोडत उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शुक्रवार 27 नोव्हेंबर, 2020 रोजी सकाळी 11 वाजता नगरपंचायत कार्यालय नायगाव येथे आयोजित करण्‍यात आली आहे. नायगाव नगरपंचायत क्षेत्रातील सर्व संबंधित नागरिकांनी आरक्षण निश्चितीच्‍या कार्यक्रमास सोडतीच्‍या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT