file photo 
नांदेड

नांदेड : कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारु दुकाने बंद- डॉ. विपीन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कर्नांटक राज्यातील 5 हजार 762 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात औराद तालुक्याच्या सीमावर्ती भागाच्या 5 किमी अंतरावरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव, मानूर, बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी या भागातील दारु दुकाने 25 ते 27 डिसेंबर 2020 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.  

या निवडणुकीसंदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये नांदेडचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्नाटक राज्याच्या 5 कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागाच्या परिसरातील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल / बीआर-2 आदी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

मोटार वाहन निरीक्षक यांचा तालुका शिबीर कार्यालयाचा दौरा   

नांदेड : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 9 तालुक्याच्या ठिकाणी मोटार वाहन निरीक्षक यांचे जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधीतील तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे. 

तालुका शिबिर कार्यालयाचा दौरा पुढील प्रमाणे राहील. कंधार- 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 5 मार्च, 5 एप्रिल, 5 मे व 4 जून. मुखेड-  7 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 8 मार्च, 7 एप्रिल, 7 मे व 7 जून. देगलूर- 12 जानेवारी, 10 फेब्रुवारी, 12 मार्च, 9 एप्रिल, 10 मे, 9 जून. हिमायतनगर - 14 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 15 मार्च, 12 एप्रिल, 12 मे व 11 जून. मुदखेड- 18 जानेवारी, 15 फेब्रुवारी, 17 मार्च, 15 एप्रिल, 17 मे, 17 जून. हदगाव- 20 जानेवारी, 17 फेब्रुवारी, 19 मार्च, 19 एप्रिल, 19 मे, 21 जून.  धर्माबाद- 22 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 22 मार्च, 22 एप्रिल, 24 मे, 24 जून. किनवट- 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 30 मार्च, 26 एप्रिल, 27 मे, 28 जून 2021. माहूर-29 जानेवारी, 26 फेब्रुवारी, 31 मार्च, 27 एप्रिल, 28 मे, 29 जून 2021 या प्रमाणे मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक हे शिबिर कार्यालयाचे आयोजन करुन जनतेची कामे पार पाडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT