Nanded Loha Nandgaon Chincholi Bad road condition 
नांदेड

Nanded News : तरूणांनी दिला जलसमाधीचा इशारा

लोहा तालुक्यातील नांदगाव, चिंचोली गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा

मारतळा : नांदगाव - चिंचोली (ता. लोहा) या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन तर सोडाच पायी चालणे हे मुश्किल झाले आहे. या खराब रस्त्यामुळे एका व्यक्तीला आठ दिवसांपुर्वीच उपचारास नेत असताना वाटेतच मृत्यूने गाठले. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मागणी करूनही लोकप्रतिनिधीसह, जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर उपरोक्त दोन गावाच्या तेरा तरुणांनी (ता.३०) ऑगष्ट रोजी गोदावरी नदीपात्रात उतरून सामुहिक जलसमाधी घेऊन जीवन संपवण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे जिल्हा व तालुका प्रशासनास दिला आहे.

नांदेड- हैदराबाद महामार्गाला व मारतळा बाजारपेठेशी जोडणाऱ्या नांदगाव - चिंचोली या दोन गावाला जोडणारा चार किलोमीटरचा रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले असल्याने या मार्गावरून वाहने तर सोडाच, पण पायी चालतानाही कसरत करावी लागत आहे. तर गंभीर रुग्णास उपचारासाठी वेळेत पोहोचणेही शक्य होत नाही, त्यामुळे मागील आठवड्यातच सुभाष भरकडे (वय ५५) यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी नेत असताना खड्ड्यामुळे त्यांचा रस्त्याच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी नांदगाव व चिंचोली या दोन गावच्या संतप्त तेरा तरूणांनी शिवारात असलेल्या गोदावरी नदीवरील आमदुरा उच्च पातळी बंधाऱ्यात (ता.३०) ऑगस्ट रोजी मंगळवारी सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. यावर धनाजी जाधव, दत्तप्रसाद जाधव, नागेश जाधव, व्यंकटी जाधव, नवनाथ जाधव, मुकिंदा जाधव, संतोष जाधव, (सर्व रा. चिंचोली) कृष्णा भरकडे, अवधूत भरकडे, महारुद्र भरकडे, माधव भरकडे, संतोष भरकडे, हरी भरकडे, (रा.सर्व नांदगाव) या तेरा तरुणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

Pune : शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा भीषण अपघात, फॉर्च्युनरची रिक्षाला धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

'बालिका वधू'च्या गहनाने १० रुपयांच्या वस्तूपासून बनवला ब्रँड; कमावतेय कोट्यवधी, तुमच्याही घरात असेलच, काय आहे ती वस्तू?

SCROLL FOR NEXT