file photo
file photo 
नांदेड

नांदेड : सरसकट पीकविम्यासाठी महाजण आंदोलन उभारणार-  प्रा. शिवाजी मोरे

प्रल्हाद कांबळे

नांदेड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शेतकरी संघटना व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंगळवारी (lता. एक) पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणे न्याय्य व वास्तव आहे, परंतु खाजगी विमा कंपनीने तो नाकारला आहे. याबाबत प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर, ऍड. धोंडिबा पवार, शिवाजीराव शिंदे, गुणवंतराव पाटील हंगरगेकर यांनी शेतकऱ्यांना सर्व कायदेविषयक व तांत्रिक बाबी उलगडून शेतकऱ्यांवर कसा खाजगी विमा कंपनीने विमा नाकारून अन्याय केला, हे सांगितले..

यावर सरसकट पीकविमा मिळविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या भेटी घेऊन व पीकविमा मिळवण्यासाठी शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, ता. 12 डिसेंबर रोजी  पीकविमा सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर सरसकट पीकविम्यासाठी महाजण आंदोलन जिल्हाभर उभारण्यात येणार आहे.

नवा मोंढा येथे झालेल्या बैठकीत नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यांतून अनेक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या भागात झालेल्या पीक नुकसानीचे वास्तव सांगितले व कशी विमा नुकसान भरपाई नाकारली हेपण त्यांनी सांगितले. तसेच अत्यल्प विमा नुकसान भरपाई दिली, हे यावरून स्पष्ट होते. विमा कंपनीकडे असणारा अपुरा कर्मचारीवर्ग व अतांत्रिक कर्मचारी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच जिल्हा पीकविमा समितीने सरसकट विमा मिळविण्यासाठी कसे दुर्लक्ष केले

तसेच ऍड. धोंडिबाराव पवार व शिवाजीराव शिंदे यांनी शरद जोशी यांना अभिवादन करण्यासाठी व पुढील महाजनआंदोलन करण्यासाठी 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हजारोंच्या संख्येने यावे, असे आवाहन केले. यावेळी किशनराव पाटील येळेकर, आर.पी. कदम, व्यंकटराव पाटील वडजे, तुकारामजी मोरे, दत्तराम पाटील, दिगंबरराव शिंदे, प्रा. उत्तमराव भोपाळकर, कोळीकर आदी सोळा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT