मराठा समाजाशी गद्दारी केली नाही : अशोक चव्हाण sakal
नांदेड

मराठा समाजाशी गद्दारी केली नाही : अशोक चव्हाण

महाविकास आघाडीची मरखेलला सभा

सकाळ वृत्तसेवा

देगलूर : भारतीय जनता पक्षाकडे विकासाचा कोणताही अजेंठा नाही. केवळ जाती पातीच्या नावाने राजकारण करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. आई तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो मी मराठा समाजाशी कधीही गद्दारी केली नाही आणि या पुढेही करणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्या प्रचारार्थ मरखेल येथे सोमवारी (ता. २५) सभा झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार मोहन हंबर्डे, डॉ. मीनल खतगावकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, शंकरराव देवकते, भगवान पाटील, प्रितीताई जयस्वाल आदी उपस्थितीत होते. श्री. चव्हाण यांनी देगलूर बिलोली मतदारसंघाला प्राधान्य देऊन मी विकासकामाला झुकते माप देणार आहे. या भागाचा विकास करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून यापुढेही मरखेल सर्कल दत्तक घेऊन विकासकामाला सुरुवात करु, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजप सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असते तर त्यांनी त्या वेळी रितसर रिपोर्ट दाखल करायला पाहिजे होता. आता या भागात येऊन काहीही खोटे नाटे सांगत असल्याचा टोलाही श्री. चव्हाण यांनी राणेंना लगावला. भाजपमध्ये सध्याचे चार पक्ष बदलून जे आले आहेत त्यांना विकासाशी काही घेणं देणं नाही. या भागातील मतदारांनी विकासाचा अजेंठा काय असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडून उत्तर मिळणार नाही. केवळ मला शिव्या दिल्या शिवाय त्यांना झोप येत नसल्याचेही ते म्हणाले.

राज्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, म्हणून महाआघाडी सरकारने नऊशे कोटी भरले परंतू केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे पिक विमाचे पैसे देण्यासाठी छळ करत असल्याचा आरोपही श्री. चव्हाण यांनी केला. कोरोनाच्या काळातही रुग्णांना सेवा देण्यासाठी महाआघाडी सरकार कमी पडले नाही. काँग्रेसची दिशा सर्वसमावेशक आहे त्यामुळे भाजपच्या भुलथापांला बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मरखेल येथील माजी सरपंच पप्पु रेडी, सरपंच नागीनबाई गवाले, उपसरपंच संदीप पाटील, चेअरमन रमेश पाटील नवळे, डॉ. ‌आनंदराव धुमाळे, शंकर पाटील आदी उपस्थित होते. मच्छिंद्र गवाले यांनी सुत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT