file photo
file photo 
नांदेड

नांदेड : डोंगरगांव येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा २२ ऑक्टोबर रोजी २०२०  अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवानंद पुयड तर प्रमुख पाहुणे म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनुरत्न वाघमारे, ज्येष्ठ ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, साहित्यिक, स्तंभलेखक गंगाधर ढवळे उपस्थित होते.

सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास गावचे माजी सरपंच श्रीनिवास महादवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गणेशराव व्यवहारे, गंगाधर व्यवहारे, शिवाजी केदारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. पाठक, एस. एस. पाटील, व्ही. पी. वैजवाडे, व्ही. बी. पवार ओ. पी. चिटकुलवार, एस. डी. चिलकर, एम. बी. जाधव या सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व गुणगौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमास गावातील माधव सूर्यवंशी, सुदामराव व्यवहारे, शिवानंद व्यवहारे, ज्येष्ठ नागरिक शिवाजी व्यवहारे, विठ्ठलराव सावंत हे उपस्थित होते. ज्या विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले त्या गुणवंत विद्यार्थीनी तन्वी आनंदराव सावंत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतही पात्र तर धनश्री सुदामराव व्यवहारे, समीक्षा शामराव सावंत, पुष्पा गणेशराव व्यवहारे या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्या त्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक व शाल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या विद्यार्थिनीं बरोबर त्यांचे पालक आनंदराव सावंत, गणेशराव व्यवहारे,  सुदामराव व्यवहारे, शामराव सावंत यांचेही अभिनंदन करण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट असे सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी केले. ते सध्या जि. प. केंद्रीय प्रा. शा गोरठा या शाळेवर कार्यरत असून ते डोंगरगाव शाळेचे विद्यार्थी होते. कार्यक्रमासाठी निकिता रुस्तुम सोळंके तसेच राहुल सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

शाळेला उज्वल यशाची परंपरा

त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्त्या अनुराधा सावंत, जयशीला केदारे, निलाबाई सावंत, मदतनीस प्रभावती केदारे या भगिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या.या स्तुत्य कार्यक्रमासाठी मुदखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी सुधीरकुमार गुट्टे, केंद्रप्रमुख एस.एस.भिसे यांनी विद्यार्थी त्यांचे पालक व सर्व शिक्षक यांचे विशेष अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. पाठक यांनी प्रास्ताविक केले. या शाळेला उज्वल यशाची परंपरा असल्याचे त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले. 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवले नाही तर ते सुद्धा नक्षलवादी व आतंकवादी बनू शकतात

यावेळी बोलताना माजी सरपंच श्रीनिवास माधवाड म्हणाले या देशाला वाचू शकतील अशी दोनच माणसे आहेत एक सीमेवरचा सैनिक  आणि दुसरा शाळेतील शिक्षक. सीमेवर सैनिक व्यवस्थित लढला नाही तर आतंकवादी देशांमध्ये प्रवेश करतात तर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवले नाही तर ते सुद्धा नक्षलवादी व आतंकवादी बनू शकतात. त्यामुळे देशाला वाचवणारे शिक्षक आणि सैनिक यांना सलाम करतो. चांगलं निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणं हे आमच आद्य कर्तव्य आहे. तर अनुरत्न वाघमारे म्हणाले वाईट माणसे इकडे तिकडे पसरू नये कारण ते सगळीकडे वाईटच पसरवतात तर चांगली माणसे सर्वत्र पसरली पाहिजेत कारण ते कुठेही गेले तरी चांगलं निर्माण करतात. चांगलं निर्माण करणाऱ्या  शिक्षकांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कवी नागोराव डोंगरे 

यांनी आईवरील कविता गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थी शास्त्रज्ञ कसे बनतात आणि विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचे संस्कार केले पाहिजे याविषयी आपले मत व्यक्त केले.ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले ज्या विद्यार्थिनीने यश संपादन केले त्यामध्ये धनश्री शिकून मोठे होऊन धनाचा वर्षाव करील, कोणताही कार्यक्रम पुष्पा शिवाय होऊच शकत नाही. कोणत्याही गोष्टीची समीक्षा केल्याशिवाय त्यातून चांगलं उत्पन्न होत नाही. मला या कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली असून मीसुद्धा माझ्या जन्मभूमी वर जाऊन अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करील अशा असा आशावाद त्यांनी व्यक्त करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला व त्यांना भावी आयुष्यासाठी अनंत  शुभेच्छा दिल्या.

शेवटी एस. एस. पाटील यांनी सर्वांचे आभार

यावेळी बोलताना तन्वी, पुष्पा यांनी त्यांच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तर यावेळी बोलताना सहशिक्षक व्हि.पी. वैजवाडे म्हणाले अमेरिकेच्या विल्मा रुडोल्फने दोन्ही पाय पोलिओने गमावले असताना इच्छाशक्तीच्या जोरावर ऑलम्पिक मध्ये तीन सुवर्ण पदक मिळवून देशाचं नाव उज्ज्वल केलं. तसे तुम्हीसुद्धा गावाच देशाचं नाव उज्ज्वल करा असा आशावाद व्यक्त केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन डोंगरगाव ही जन्मभूमी असलेले प्राथमिक पदवीधर शिक्षक शंकर नामदेव गच्‍चे कार्यरत शाळा जि.प.प्रा. शाळा वायवाडीसृ ता. हिमायतनगर जि. नांदेड या शिक्षकांनी केले. शेवटी एस. एस. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT