file photo 
नांदेड

 नांदेड - “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” वेबीनारद्वारे साजरा करण्यात येणार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव माहिती देण्यासाठी शुक्रवार (ता. 18 डिसेंबर 2020) रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता ऑनलईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर ह्या संबोधित करणार आहेत.

संयुक्‍त राष्‍ट्रसंघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्‍ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्‍पसंख्‍याकांच्‍या हक्‍काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्‍तृत केला आहे. त्‍यानुसार अल्‍पसंख्‍याक नागरिकांना त्‍यांची संस्‍कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्‍यादींचे संवर्धन करता यावे यादृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याबाबत राष्‍ट्रीय आयोगाने सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार प्रत्‍येकवर्षी 18 डिसेंबर हा दिवस जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने “अल्‍पसंख्‍याक हक्‍क दिवस” म्‍हणून राबविण्‍यात येतो.

अल्‍पसंख्‍याक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-19 च्‍या विषाणुच्‍या संसर्गाची पार्श्‍वभूमी विचारात घेता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसहभागाबाबत देखील योग्‍य खबरदारी घेवून 18 डिसेंबर हा दिवस अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून ऑनलाईन / वेबिनार इत्‍यादी पद्धतीने साजरा करण्‍याबाबत सूचना दिल्‍या आहेत. तसेच या दिवसाच्‍यानिमित्ताने अल्‍पसंख्‍यांकांना त्‍यांच्‍या घटनात्‍मक आणि कायदेशीर हक्‍काबाबत जाणीव किंवा माहिती करुन दिली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने 18 डिसेंबर 2020 रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी 11 वाजता पुढील ऑनलाईन, वेबीनारद्वारे साजरा करण्‍यात येत आहे. या कार्यक्रमास व्‍याख्‍याता म्‍हणून ॲड. विजयमाला संभाजी मनवर नांदेड ह्या संबोधित करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रम्प यांच्या कार्यक्रमात गोळीबार, सिक्रेट सर्विसने वाचवला जीव; हल्लेखोर ताब्यात, VIDEO VIRAL

Mumbai Politics: मराठी रिक्षाचालकांना अडवल्यास फोडून काढू: अमित ठाकरेंचा परप्रांतीय आंदोलकांना इशारा, अन्यथा रस्त्यावरच मार खाल!

Rahul Gandhi: ममता बॅनर्जींची गरिबांऐवजी श्रीमंतांना मदत: राहुल गांधी, ‘देशभक्त’ मोदींकडून देशाचीच विक्री!

IPL 2026: तासाभरातच वैभव सूर्यवंशीकडून अभिषेक शर्माने हिरावली Orange Cap; शर्यतीत टॉप-५ फलंदाज कोण?

विकेंडला बनवा कॅफे-स्टाइल झटपट क्रीमी एग सँडविच; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल

SCROLL FOR NEXT