file photo 
नांदेड

नांदेड : बिनविरोध ग्रामपंचायतसाठी 25 लाखाचा निधी देणार- आमदार मोहन हंबर्डे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड (दक्षिण) चे आमदार मोहन हंबर्डे यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध ग्रामपंचायत ज्या गावांनी काढली त्या गावाच्या विकासासाठी आता लगेच पाच लाख व त्यानंतरच्या पुढील वर्षभरात वीस लाख असे 25 लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. नामांकन माघे घ्यायच्या दुसऱ्या दिवशीच पत्र देऊन आश्वासनाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणार असल्याचे आमदार हंबर्डे यांनी स्पष्ट केले आहे.

गाव पातळीवरील निवडणुका कशा अवघड आणि अडचणीच्या असतात. नातं गोत, भाऊ बंदकी या निवडणूकामुळे दुरावतात. देशातील सर्वात अवघड व कठीण ही निवडणूक असते. निवडणुकीनंतर गावात दोन फळ्या पडतात. त्यातून गावात नेहमीच वाद- विवाद होत असतात.  मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावात वाद व भांडण होऊ नये म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनी बिनविरोध ग्रामपंचायत काढा आणि 25 लाख रुपयांचा निधी मिळवा असे जाहीर केले आहे.

ता. 4 जानेवारी रोजी नामांकन मागे घ्यायची शेवटची तारीख आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमदार हंबर्डे हे तात्काळ बिनविरोध गावासाठी पाच लाख रुपयांचे पत्र देणार आहेत. त्यानंतर पुढील वर्षभरात 20 लाख रुपयांचा निधी असा पंचवीस लाख रुपयांचा निधी गावांसाठी देणार आहे. जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात बिनविरोध ग्रामपंचायत काढण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी जाहीर करणारे आमदार हंबर्डे हे कदाचित पहिले आमदार होत. गावात एकोपा रहावा ही त्यांची तळमळ आहे. गाव विकासासाठी बिनविरोध निवडणूक ही भूमिका सर्वांनी स्वीकारावी व गावाच्या हितासाठी अंतर्गत विरोध बाजूला ठेवावा असे आवाहन आमदार हंबर्डे यांनी केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT