file photo 
नांदेड

नांदेड : आमदार रातोळीकर यांची पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारानिमित्त नांदेड जिल्हा वकील संघाला भेट

प्रल्हाद कांबळे

नांदेड - भाजपा व मित्र पक्षाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्त विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांनी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे जाऊन वकील बांधव, भगिनी आणि न्यायालयीन कर्मचारी यांच्या भेटी घेऊन बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी चारशे ते पाचशे पदवीधर मतदारांना भेटी देऊन श्री बोराळकर हे कसे इतर उमेदवारांपेक्षा सरस व काम करणारे आणि पदवीधरांचे ज्वलंत प्रश्न सोडविणारे उमेदवार आहेत. तसेच त्यांच्या माध्यमातून पदवीधरांचा व वकील संघाचा कसा विकास करता येईल, हे मतदारांना पटवून सांगितले. त्याचबरोबर वकील संघाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. चैतन्यबापू देशमुख, रवी पाटील खतगावकर, अरूण सुकळकर, ऍड. रावसाहेब देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ऍड. मिलींद लाठकर, माजी अध्यक्ष ऍड. मिलींद एकताटे, ऍड. शैलेश देशमुख, ऍड. संभाजी देशमुख, ऍड. अमित डोईफोडे, ऍड. चंद्रकांत पत्की, ऍड. रविंद पाटील, ऍड. कार्तिक बोकारे, ऍड. एन.व्ही. रेड्डी, ऍड. राम जाधव, ऍड. मोरे, ऍड. चक्रेश बन्नाळीकर व इतर वकील बांधव उपस्थित होते.

तसेच आमदार रातोळीकर यांनी हदगाव व हिमायतनगर मतदारसंघाचा झंजावती दौरा करून पदवीधर मतदारसंघातील बुथप्रमुख, बुथपालक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवडणूक रचनेचा व नियोजनाचा आढावा घेतला. तसेच हदगाव शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. तसेच ते येत्या 28 तारखेला हदगाव व हिमायतनगर मतदारसंघातील संपूर्ण 9 बुथच्या बुथनिहाय बैठका घेऊन पदवीधरांशी संवाद साधणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT