file photo 
नांदेड

नांदेड मनसेचे इंजीन प्रकाश कौडगे यांच्या हाती

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील धडाडीचे कार्यकर्ते प्रकाश कौडगे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

जिल्ह्यातील नायगाव, भोकर व हदगाव विधानसभा क्षेत्राची जबाबदारी प्रकाश कौडगे यांच्यावर टाकण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कौडगे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभिजीत पानसे उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय धोरणे व कार्यक्रम आपल्या विभागात निष्ठेने राबवावी तसेच मराठी बांधवांना अभिमान वाटेल असे कार्य आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा यांनी नियुक्तीपत्रात पक्षाने व्यक्त केली आहे. प्रकाश कौडगे यांनी यापूर्वी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची साडेबारा वर्ष धुरा सांभाळली होती. त्यानंतर शिवसेनेतील काही अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात जावे लागले. त्याठिकाणी त्यांच्या महानगराध्यक्ष या पदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यांनी या काळात पक्ष बांधणीचे काम केले. मात्र तेथेही त्यांचे मन रमले नाही. पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सेनेला जयमहाराष्ट्र करत पक्ष सोडला होता. सहा महिण्यापूर्वीत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. ते मनसैनिक म्हणून काम करत होते. मात्र त्यांची पक्षाप्रती निष्ठा व काम करण्याची तळमळ लक्षात घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली. प्रकाश कौडगे यांचा जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा असून कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्याकडे आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात गाव तिथे मनसेची शाखा स्थापन करुन तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत राहील असा विश्वास प्रकाश कौडगे यांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: नवरात्रीत सोन्याच्या दरात मोठी घसरण! चांदीही 13,500 रुपयांनी स्वस्त; 22 आणि 24 कॅरेटचा ताजा भाव किती?

IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल मास्टरप्लॅन, स्वत:च्या खर्चानेच ५ गोलंदांजाना सोबत नेणार

Latest Marathi News Live Update : यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन परतताना हसन मुश्रीफ यांचे वाहन शेतकऱ्यांनी अडवले, गोकाकजवळील घटना

Mumbai Local: देवीच्या दर्शनासाठी लोकल प्रवास करताय? वेळापत्रक पहाच, 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक रेल्वे सेवा रद्द

Water Storage: जिल्ह्याच्या साठ्यापैकी पिण्यासाठी ५.२८ टीएमसी पाणी मिळणार ;नियोजनचे आव्हान; दर दहा दिवसांनी घेणार आढावा

SCROLL FOR NEXT