file photo 
नांदेड

नांदेड : मुलाच्या डोईवर अक्षदा पडण्यापूर्वीच मातेचे निधन, बिलोली शहरातील ह्रदयदावक घटना 

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : आठ- दहा वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपलेल्या बिलोली शहरातील एका तरुणाच्या डोईवर अक्षदा पडण्यापूर्वी त्याच्या आईचे हृदय विकारामुळे निधन झाल्याची दुः खद घटना गुरुवारी (ता. २४) घडल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मुलाचा लग्नविधी उरकला असला तरीही आईच्या निधनामुळे गुडमलवार कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे.

बिलोली शहरातील बुरुड गल्लीमध्ये वास्तव्यास असलेल्या गुडमलवार कुटुंबीयांवर गुरुवारी दुःखाचा डोंगर कोसळले. नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आनंद गुडमवार यांचे कनिष्ठ बंधू गोविंद बालाजी गुडमलवार यांचा काल भोकर तालुक्यातील लगळूद येथील गंगाधर सुलबेवार यांच्या मुलीशी विवाह सोहळा पार पडला. आठ- दहा वर्षांपूर्वी गोविंद यांच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे ते पोरके झाले होते. वडिलांच्या निधनानंतर आई लक्ष्मीबाई व भाऊ आनंद यांनी कुटुंबातील सर्वांच्या गरजा पूर्ण करुन आधार दिल्यामुळे त्यांची योग्य वाटचाल सुरु होती.

मागील महिनाभरापासून आईने गोविंदच्या लग्नाची पूर्ण तयारी केली होती. बुधवारी देवकार्य पार पडले. नवरदेवाला विवाहस्थळी पाठवून दिले गेले. त्यानंतर गुरुवारी पहाटे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरु झाली. लग्नाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. वर्‍हाडी मंडळी लग्नाला निघालेली असताना सकाळी आठ वाजताच्या सुमारास नवरदेव मुलाची आई लक्ष्मीबाई बालाजी गुडमलवार (वय ६०) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे त्यातच निधन झाले.  

लक्ष्मीबाईच्या निधनाची वार्ता समजताच बिलोलीसह लग्न सोहळ्यात असलेल्या भोकर तालुक्यातील लगळूद येथील लोकांना दुःख झाले. मात्र नियोजित लग्नसोहळ्याला फाटा न देता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा आ
पावा लागला. त्यानंतर रात्री सात वाजताच्या सुमारास बिलोली येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शोकाकुल वातावरणात लक्ष्मीबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्याची जय्यत तयारी करुन आनंदाच्या क्षणी त्याच्या डोईवर अक्षदा न टाकताच जगाचा निरोप घेणाऱ्या लक्ष्मीबाई या दुर्दैवी मातेबरोबरच आईच्या प्रेम व आशीर्वादापासून पोरक्या झालेल्या मुलाच्या कुटुंबात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.    

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT