Nanded MSEB load shedding
Nanded MSEB load shedding Sakal
नांदेड

नांदेडला कोणत्याही क्षणी बत्ती गुल...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मे महिन्याच्या कडक उन्हाची तीव्र लाट कमी झाली असली तरी जून महिन्याचा उकाडा कायम आहे. अशा वातावरणात महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसा- रात्री अशा कोणत्याही क्षणी वीज पुरवठा खंडित होत आहे. काही भागात तर वीज गेल्यानंतर रात्रभर येत नसल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. ही अघोषित भारनियमन असल्यासारखी स्थिती आहे. महावितरणचा हा हलगर्जीपणा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.

मान्सूनपूर्व कामे केल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. अजूनही नांदेडात माॅन्सूनचे आगमन झाले नाही. मात्र, तरीसुद्धा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार थांबता खांबत नाही. शहरातील सिडको - हडको, शिवाजीनगर, वाडी, तरोडा (बुद्रुक), तरोडा (खुर्द), सांगवी, चौफाळा आदी भागांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या सर्वात जास्त तक्रारी आहेत. मे महिन्यातही हीच परिस्थिती शहरात कायम होती.

उकाडा अद्यापही कायम

आता मे महिन्याचा कडक उन्हाचे तीव्र चटके संपून जून महिन्याला सुरुवात झाली आहे. या दिवसात कडक ऊन कमी असले तरी उकाडा आणि धुमस खुप जास्त आहे. त्यामुळे कुलर आणि पंख्याविना व्यक्ती राहू शकत नाही. अवघ्या पाच मिनिटात गरमीमुळे नागरिक घामाघूम होत आहे. अशा या वातावरणात महावितरणकडून वेळो-अवेळी कधीही वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. रात्री कधीही वीज जात असल्याने गरमीमुळे नागरिकांची झोपमोड होत आहे.

विजेचा लपंडाव सुरुच

शहराच्या तरोडा नाका भाग, शिवाजीनगर परिसरात दोन दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत आहे. परिणामी या भागांतील नागरिकांना गरमीमुळे रात्र जागून काढावी लागत आहे. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना मोठा त्रास सहन होत असून, विजेचा हा लपंडाव शहरात अनेक भागात सुरुच आहे.

ट्रिपिंगचे कारण सांगून हात वर

होत असलेल्या वीज पुरवठा खंडितमुळे महावितरणकडून एक प्रकारे अघोषित भारनियमन असल्याची स्थिती आहे. ट्रिपिंग आणि केबल दुरुस्तीचे कारण सांगून महावितरण वस्तुस्थिती लपवत आहे. शहरात वारंपार ट्रिपंग कशी होते, हा एक प्रश्नच आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT