Nanded Mukhed market committee administrative board sakal
नांदेड

नांदेड : मुखेडच्या बाजार समितीवर आठ दिवसात प्रशासकीय मंडळ!

माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

मुखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे सत्ताधारी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून येत्या आठ दिवसाच्या आत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त होईल अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनी दिली.

येथील बाजार समितीवर आमदार डॉ. तुषार राठोड यांची एक हाती सत्ता असून सभापती खुशाल पाटील यांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष बाजार समितीचा कारभार करण्यात आला. दरम्यानच्या काळात वाढत्या तक्रारीमुळे सभापतींचे काही अधिकार काढून एका संचालकांना दिल्यामुळे सभापती हे रबरी शिक्का बनून गेले असल्याची चर्चा होती. असे असले तरीही आमदारांनी बाजार समितीवर पुन्हा आपलेच वर्चस्व रहावे यासाठी सहकार मंत्र्याकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला आहे.

मात्र मागील दोन-तीन आठवड्यापासून होत असलेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकांमध्ये मंत्रीमडळाचे सचिव व मंत्रीमहोदय निवडणूक प्रक्रीयेमध्ये व्यस्त असल्याने मुदतवाढ की प्रशासक मंडळ यांचा अंतिम निर्णय झाला नाही. याचा काय निर्णय होते याकडे राजकीय मंडळी व शेतकऱ्यांत चर्चा केली जात आहे.

बाजार समितीच्याअंतर्गत रस्त्यासाठी ३५ लाख

कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पाच वर्षात शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत. बाजार समितीच्या आवारात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संरक्षक भिंतीचे काम करण्यात येणार असून इमारतीचीही दुरूस्ती व रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्याच बरोबरीने बाजार समितीच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था व शेतकऱ्यांच्या वाहनांना होत असलेल्या अडचणी पाहता नविन रस्ते बांधणीसाठी सुमारे ३५ लाख रूपये मंजूर करण्यात आले असून लवकरच निविदा प्रक्रीया पूर्ण करून कामाची सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बेटमोगरेकर यांनी दिली. या वेळी बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील जाधव, बालाजी पाटील गुट्टे, नंदकुमार मडगुलवार, अशोकसेठ जाजू, विशाल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT