Nanded mukhed Primary Health Centre New Building roof collapsed 
नांदेड

नांदेड : उद्‍घाटनापूर्वीच आरोग्य केंद्राचे छत कोसळले

तीन वर्षे होऊनही बंदच अवस्थेत; बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

मुक्रमाबाद : मुक्रमाबाद (ता. मुखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या एका खोलीतील छतास तडे जाऊन छताचा काही भाग उद्‍घाटनाच्याआधीच पडल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मुक्रमाबाद येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत होण्याच्या आधीच इमारतीच्या एका खोलीतील छताचा काही भाग पडत असल्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शासनाची मान्यता मिळून पाच वर्ष पूर्ण झाली असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कोट्यावधीचा खर्च करून मागील तीन वर्षापूर्वी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. संबंधित कंत्राटदाराने बांधकाम पूर्ण करून इमारत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपुर्द केली. तीन वर्षापासून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्‍घाटनाचा मुहुर्त अद्यापही जिल्हा परिषदेला मिळालेला नाही.

राजकीय गटबाजीच्या फेऱ्यात येथील आरोग्य केंद्राचे उद्‍घाटन रखडले आहे. या आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण कर्मचारी वर्ग, रुग्णवाहिका उपचाराची साहित्य हे सर्व काही उपलब्ध असूनही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होऊ शकले नाही. निजामकालीन राजवटीत बांधलेल्या इमारतीमध्ये चालू असलेला नागरी दवाखाना हा या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये सुरक्षेच्या कारणावरून सुरू करण्यात आला होता.

यातच मंगळवारी मध्यरात्री स्लॕबचा भाग पडल्याचा आवाज आल्याने उपस्थित कर्मचारी वर्गाने झोपेतुन उठून पाहिले असताना पेडीयाट्रीक कोव्हीड केअर हाॕलच्या समोरील स्लॕबचा काही भाग पडत असल्याचे दिसले. या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षयसिंग परदेशी यांना विचारले असता छताचा काही भाग कोसळला असून यात कुणालाही दुखापत किंवा जीवीतहानी झाली नसून सदरील घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली असल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT