Nanded Municipal Corporation Pay attention to income growth sakal
नांदेड

नांदेड महापालिकेच्या उत्पन्नवाढीवर लक्ष द्यावे

सभापती किशोर स्वामी; स्थायी समितीची सभा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महापालिकेचे (Nanded Municipal Corporation) उत्पन्न वाढविण्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे त्याचबरोबर अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचनाही स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी सोमवारी (ता. २७) केल्या. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामास आळा घालण्यासाठीही उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात सभापती स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी उपायुक्त तथा नगरसचिव अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, माजी सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, बालाजी जाधव, कविता मुळे, राजू काळे, मुख्य लेखाधिकारी तुकाराम भिसे यांच्यासह सदस्य, अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी तेरा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आणि सवार्नुमते त्यास मंजुरी देण्यात आली.

या सभेत प्लॅस्टिक बंदी, अतिक्रमण, पाणीपुरवठा, गुंठेवारी, बांधकाम परवानगी, कोरोना व आरोग्य विभाग, आकृतीबंध आदी विषयावर चर्चा करण्यात आली. नळ तपासणी आणि चुकीचे बिल याबबात तत्काळ सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना सभापती स्वामी यांनी दिल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ महापालिका स्वागत कक्षाकडे जाणारा मार्ग दर्शविणारा फलक लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

महापालिकेत सध्या किती अधिकारी, कर्मचारी कामावर आहेत, याची माहिती घेऊन आकृतीबंध संबंधी सभापतींनी माहिती घेतली. त्याचबरोबर कामात प्रगती करा. महापालिकेत बायोमेट्रिक मशीन बसवा, कर भरणाऱ्या नागरिकांना धन्यवाद संदेश द्या, वीज पुरवठा सुरळीत ठेवा तसेच किरकोळ दुरूस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT