file photo 
नांदेड

नांदेड : दहा एप्रील रोजी राष्ट्रीय लोकअदालत; प्रलंबीत प्रकरणांसाठी हक्काचे व्यासपीठ

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तर्फे ता. १० एप्रील रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा न्यायालय, नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय, नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. 

याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. 

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व सन्माननीय विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रिय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम रा. जगताप आणि जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत शिरला बिबट्या, पाळीव कुत्र्यावर केला हल्ला; सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

कार्यकर्त्यांचे ऐकून सर्व प्रयोग झाले, कुठेच 'स्कोप' नाही, आता भाजपमध्ये आलो; समरजीत घाटगेंची घरवापसी

Iran Israel War impact: इराण-इस्रायल युद्धाचा गव्हाच्या खरेदीला फटका! पोत्यांच्या टंचाईवर योगी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

SCROLL FOR NEXT