nanded  esakal
नांदेड

Nanded News : अपहरण झालेल्या चिमुकल्याची सात तासात सुटका, आरोपीला केलं जेरबंद

आरोपीचे लोकेशन तेलंगणातील बासर रेल्वेस्टेशन निश्चित झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांचे पथक रेल्वेस्टेशनमध्ये गेले.

सकाळ वृत्तसेवा

तामसा - तामसा येथील सात वर्षीय मुलाचे त्याच्या चुलत काकाने अपहरण केल्यानंतर तामसा पोलिसांनी सात तासात चिमुकल्याची सुटका करीत अपहरणकर्त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

आरोपी सुनील कडभाने रा. उमरखेड (सध्या वास्तव्याला तामसा) याने चुलत भाऊ शंकर याचा सात वर्षाचा मुलगा कार्तिकेश याचे शनिवारपासून दोन लाख रुपयाची मागणी करीत अपहरण केले होते.

या प्रकरणी रविवारी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी दळवे यांना मार्गदर्शन करीत पथक अपहरणकर्त्याच्या शोधासाठी पाचारण केले.

अपहरणकर्त्याचे त्याच्या मोबाईलद्वारे लोकेशन घेतले जात होते. तामसा पोलिसांच्या पथकासोबत कार्तिकेशचे आई-वडील होते. आरोपीचे लोकेशन तेलंगणातील बासर रेल्वेस्टेशन निश्चित झाल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांचे पथक रेल्वेस्टेशनमध्ये गेले. कार्तिकेश दिसताच आई-वडिलांनी पोलिसांना सूचना करून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी सुनीलला जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT