nanded news membership canceled third child is proved Order of Collector in medanakallur case marathi news esakal
नांदेड

Nanded News : तिसरे अपत्य सिद्ध झाल्याने सदस्यत्व रद्द; मेदनकल्लूर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

मेदनकल्लूर येथील एका ग्रामपंचायत सदस्यास तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले

सकाळ वृत्तसेवा

देगलूर : मेदनकल्लूर येथील एका ग्रामपंचायत सदस्यास तिसरे अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केले आहे. मेदनकल्लूर येथील ग्रामपंचायतची २०२० मध्ये पोटनिवडणूक होऊन प्रभाग एक मधून सिद्धी शबाना बेगम सिद्धी सद्दाम या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आल्या होत्या. निवडणूक लढवण्यापूर्वीच त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार सिद्धी बाबर हुसेन सदाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (ता.चार) जुलै रोजी केली होती.

सिद्धी शबाना बेगम यांना यापूर्वीच सिद्धी हुसेन सिद्धी सद्दाम, सिद्धी तैमूर सिद्धी सद्दाम व सिद्धी दानीश सिद्धी सद्दाम हे तीन अपत्य असल्याचे पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. याप्रकरणी सुनावणी होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे (ता.२८) सप्टेंबर रोजी सिद्धी शबाना सिद्धी सद्दाम यांचे ग्रामपंचायत सदस्य रद्द करण्याचे आदेश पारित केले.

(ता.१२) सप्टेंबर २००१ रोजी शासनाने एक परिपत्रक काढले होते त्यात दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही. असे निर्बंध लागू केले असतानाही काही जण निवडणुकीसाठी उभे राहून तिसरे अपत्य असल्याचे जाणूनबुजुन लपवून ठेवत असतात.

मात्र ते जर पुराव्यानिशी सिद्ध झाले तर याप्रकरणी फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो असे या परिपत्रकात म्हटलेले आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुक्यातील मेदनकल्लूर येथील एका ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT