file photo 
नांदेड

नांदेड : गाव पातळीवर कृषी सहायकाचे असहकार्य; सावरगाव (नि) ग्रामस्थांच्या बदलीची मागणी

प्रल्हाद कांबळे/ कृष्णा जोमेगावकर

नांदेड : कंधार तालुक्यातील सावरगाव (नि) येथील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवताना कृषी सहाय्यकाकडून सहकार्य होत नसल्यामुळे त्यांची बदली करण्याची मागणी करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) प्रकल्पाच्या सूक्ष्म नियोजनावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन सरपंच व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कंधार तालुक्यातील सावरगाव (नि) येथे कृषी सहाय्यक संभाजी वडजे मागील तीन वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविल्या नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविताना सरपंच अर्चना मरडे यांनी प्रयत्न केले. यात अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत, परंतु कृषी सहाय्यकाच्या सहकार्यामुळे एकही लाभ गावकऱ्यांना मिळाला नाही. या प्रकल्पात गाव शून्य आहे. वेगवेगळ्या कारणाने गावपातळीवर राजकारण करून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ कृषी सहायक मिळू देत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे सरपंचासह गावकऱ्यांनी कृषी सहायक संभाजी वडजे यांची बदली करण्याची मागणी करत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजनाच्या आराखड्यावर बहिष्कार टाकल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जोपर्यंत बदली करुन नव्याने कृषी सहायकाची नेमणुक होणार नाही तोपर्यंत बहिष्कार कायम राहील, पोखरा कार्यक्रम निर्धारीत वेळेत राबविण्यात यावा, यास विलंब केल्यास सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच अर्चना गोविंद मरडे, ग्रामपंचायत सदस्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT