file photo 
नांदेड

नांदेड : शहरातील वसंतनगरमध्ये जुन्या वादातून एकाचा भोसकून खून 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या वसंतनगर भागात जुन्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना रविवारी (ता. ३१) रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणातील दोन्ही मारेकरी विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विमानतळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, व्यंकटेशनगर हिंगोली गेट उड्डाणपूल, नांदेड परिसरात राहणारा शुभम शिवराम गुरव (वय २२) याचे आणि चंद्रकांत शामराव तारु (वय २२) राहणार वसंतनगर या दोघांचा जुना वाद होता. या वादातून रविवारी रात्री चंद्रकांत तारु आणि त्याचा एक अल्पवयीन सहकारी या दोघांनी शुभम गुरव याला वसंतनगर भागात गाठले. त्याच्याशी सुरुवातीला वाद घालून चक्क त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. चंद्राकात तारुने शुभमच्या पोटात चाकूने भोसकून त्याचा खून केला. शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. 

या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव हे आपल्या पथकासह घटास्थळी दाखल झाले. शुभम गुरव याचा मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. गुप्त माहिती काढून पोलिसांनी अवघ्या चार तासात आरोपी चंद्रकांत तारु रा. वसंतनगर आणि त्याचा एक १६ वर्षीय (अल्पवयीन) मित्र या दोघांना ताब्यात घेतले आहे. ज्ञानोबा सखाराम गुरव यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT