file photo 
नांदेड

नांदेड : बदली झालेल्या ठिकाणी न जाणाऱ्यांना दणका, वेतन रोखण्याचे काढले आदेश

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बदली झालेल्या ठिकाणी रुजु न होता राजकिय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या मुख्यालयीच राहून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागेपुढे राहून आपली पोळी भाजून घेणारी मंडळी जिल्हा परिषदमध्ये मागील अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत. माहूर- किनवट भागात बदली झाल्यानंतरही प्रतिनियुक्तीच्या नावावर ठाण मांडून बसणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना आता आपले बिऱ्हाड गुंडाळण्याची वेळ आली आहे. नेमनुकीच्या ठिकाणी न जाणाअया कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

माहूर व किनवट तालुक्यात मूळ प्रस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढू नये असे आदेश देताना संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुद्धा प्रस्थापित करावी असे प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषदेत कोणाला कधी कोणत्या टेबलचा ताबा दिला जाईल याचा नेम नसतो. कारण पदाधिकारी बदलला की त्या विभागाच्या प्रशासकीय रचनेतही बदल होत असतात. या परिस्थितीचा फायदा राजकीय बैठकीत असणारे काही कर्मचारी मोठ्या खुबीने उचलत असतात.

बदली कुठेही झाली तरी मुख्यालयात प्रतिनियुक्ती याबाबत नेहमी ओरड होत असली तरी त्यांना मूळ पदावर पाठवण्याची हिंमत कोणी दाखवत नाही. उपरोक्त पद्धत पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. माहूर व किनवट तालुक्यात बदली झालेले अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वेगवेगळ्या विभागात टेबलावर ताबा करुन बसलेले आहेत. राजकीय स्तरावरुन त्यांना अनुकूल भूमिका मिळत असल्याने अशा प्रतिनियुक्ती घटकावर जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रित केले आहे.

त्यामुळे वेगवेगळ्या विभागात ठाण मांडून बसलेल्या अशा कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. बदलीनंतर स्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच प्रतिनियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे निर्देश सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. पंचायत समिती स्तरावर असलेल्या अशा कर्मचाऱ्यांचे वेतनही रोखण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रतिनियुक्तीच्या नावावर वेगवेगळ्या विभागात ठाण मांडलेल्या अनेकांना आपले बिऱ्हाड बांधावे लागणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Tragedy Case : प्रांजलने गळफास घेतल्याचे अभिजीतला समजलं अन् त्यानेही नको होतं तेचं केलं; काही तासात एकाच गल्लीत दोघांनी उचललं टोकाचं पाऊल

Pune News: पुण्यात अरुंद रस्त्यांचे आता डांबरीकरण; महापालिका आयुक्तांचा निर्णय, सिमेंट काँक्रिटीकरणाला ब्रेक!

Nagpur Weather : भर उन्हाळ्यात नागपूर बनले ‘हिलस्टेशन’; पारा आठ अंशांनी घसरला

Iran war : इराण युद्धाचा फटका! पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले, डिझेल ५२० रुपये प्रतिलिटर तर पेट्रोल...

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

SCROLL FOR NEXT