file photo 
नांदेड

नांदेड : जिल्ह्यात एड्स दिनानिमित विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात सुमारे सहा हजार 374 ॲक्टीव्ह एचआयव्ही रुग्ण उपचार घेत आहेत. यात पुरुष दोन हजार 953, महिला दोन हजार 938, टीजी 12, बालक 460 आदींचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर योग्य ते उपचार केले जात असून त्यांना दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र देवून मोफत बस प्रवास, घरकुल, संजय गांधी निराधार योजना आदि सुविधांचा लाभ पोहचावा. यादृष्टीने एनजीओमार्फत विशेष प्रयत्न केले जात असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

जागतिक एड्स दिनानिमित ता. एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग नांदेड, श्री. गरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रूग्णालय नांदेड अंतर्गत एचआयव्ही, एड्स जनजागरणासाठी जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जागतिक एड्स दिनानिमित जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जागतिक एकता आणि सामुहिक जबाबदारी याद्वारे आपण एचआयव्ही, एड्स विरुध्द जनजागृती करुन एड्सचा धोका टाळु शकतो असे आवाहन केले आहे.

यामध्ये सोशल मिडीयावरती एचआयव्हीची माहिती देणारे विविध व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले. तसेच मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे कोविड 19 चे नियम पाळुन एचआयव्ही टेस्टींग शिबिर घेण्यात आले. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मास्क डिझाईनिंग, जिआयएफ, मिम्स, सेल्फी विथ स्लोगन आदी ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नेहरु युवा केंद्रातील युवा क्लबच्या माध्यमातुन जिल्ह्यातील वीस गावामध्ये एचआयव्ही, एड्स बद्दल जनजागरणाकरीता वॉल पेंटींग आणि पोस्टर प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यावर्षी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी पहिल्या तिमाहात करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना आदेशित केले. गरोदर मातापासुन बाळाला होणाऱ्या एचआयव्हीचे प्रमाण शुन्यावर आणता येईल. जागतिक एड्स दिनानिमित एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रायवेट हॉस्पीटल (पीपीपी) ज्यांनी गरोदर मातासाठी उत्कृष्ट काम केले. त्यांना देखील प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवुन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT