Nanded illegal Sand storage thieves rise sakal
नांदेड

नांदेड : सराईत वाळूचोर उठले महसूलच्या जिवावर

अधिकाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी निराधार तक्रारीची मालिका

साजीद खान

माहूर : पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये बेकायदेशीर वाळू साठे असल्याच्या अनेक तक्रारी शासन दप्तरी दाखल करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. पत्र पंडितांच्या प्रमादामुळे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तक्रारीची दखल घ्यावी लागत आहे. परंतु तक्रारकर्त्यांची नावे पाहिल्यानंतर काहींवर आज मितीस वाळू चोरी प्रकरणी कारवाई सुरू आहे, तर काही जणांवर आत्तापर्यंत गौण खनिज चोरीसाठी लाखो रुपयांचा दंड आकारला गेला असल्याने माहूर तालुक्यात ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.

माहूर तालुक्याचा नैसर्गिक वैभव असलेल्या पैनगंगा पात्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती. हे सर्वश्रुत, अशा वाळू चोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी किनवट विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रभावी उपाययोजना करुन बैठे पथक फिरते पथक व प्रसंगी रात्री-बेरात्री नदीकाठच्या गावांना भेटी देऊन अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता.

शासनाचा महसूल बुडवून होणाऱ्या वाळू चोरीवर लगाम लावण्यासाठी शिवाय बांधकाम धारकांना अल्पदरात वाळू उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने माहूर तालुक्यातील लांजी, टाकळी व सायफळ येथील वाळू घाटांचा लिलाव आयोजित केला. वाळू घाटाच्या ऑनलाईन लिलावात १३ ते १७ लाख रुपये पर्यंत किंमत असलेले वाळू घाट अपेक्षे पेक्षाही जास्त अनुक्रमे दीड कोटी रुपयांच्या वर गेले. यातून शासनाला चांगला महसूल देखील मिळाला.

वाळू घाटाची मुदत संपल्यानंतर वाळूची चोरटी विक्री करणारे महाभाग सक्रिय होऊन किरकोळ वाळूसाठे करून ठेवले. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी श्री.सुगावे, श्री.चव्हाण व त्यांच्या अधिनस्त तलाठ्यांनी बेकायदेशीर वाळू साठ्यांचे पंचनामे करून ताब्यात घेण्याची कारवाई केली. परंतु एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या सराईत वाळू चोर ज्यांच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल असून लाखो रुपयांचा दंड बजावण्यात आलेला आहे. असे वाळूमाफिया आता सामाजिक कार्यकर्ते म्हणून वाळू चोरीच्या तक्रारी घेऊन मध्यामा समोर येत आहेत.

वाळू चोराच्या उलट्या बोंबा!

स्वतःवर बेकायदा वाळू, मुरूम उपसा करून चोरटी वाहतूक केल्याचे अनेक प्रकरण सुरू असताना स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते बनून प्रशासनाला वेठीस धरण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करून त्यांची प्रतिमा समाजात मलीन करणाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची सत्यता पडताळणी व त्यांच्याविरुद्ध दाखल असलेले मागील गुन्हे, वसूल करण्यात आलेला दंड संबंधित गावात त्यांच्या विरुद्ध असलेला जनप्रक्षोभ इत्यादी संपूर्ण बाबीची विस्तीर्ण चौकशी करून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सराईत व संघटित गुन्हेगारी कायद्याखालील विशेषाधिकाराचा वापर करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी कायदा प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद राहणार

SCROLL FOR NEXT