पनवेल- नांदेड रेल्वे esakal
नांदेड

नांदेड-पनवेल एक्स्प्रेस पूर्ववत,मार्ग बदलून धावणार

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही एक्सप्रेस मार्ग बदलून धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कळविले आहे.

प्रमोद चौधरी

नांदेड : रेल्वे क्रमांक ०७६१४ नांदेड-पनवेल एक्स्प्रेस १४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान, तर ०७६१३ पनवेल-नांदेड एक्स्प्रेस १५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली होती. परंतु, प्रवाशांची मागणी लक्षात घेता या एक्स्प्रेस मार्ग बदलून धावणार आहेत. रेल्वे क्र. ०७६१४ नांदेड-पवनेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच नांदेड येथून सुटेल. परंतु १४ ते २७ ऑक्टोबर दरम्यान लातूर रोड, कुर्डूवाडी, मिरज, पुणे या मार्गाने (Nanded-Panvel Express) धावणार आहे. तसेच ०७६१३ पवनेल ते नांदेड एक्स्प्रेस देखील पूर्वीप्रमाणेच पनवेल येथून सुटून २८ ऑक्टोबर दरम्यान पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावेल. १४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेमध्ये सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान २६.३३ किलोमीटरचे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती (Nanded) घेण्यात येणार आहे.

यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेसवरही त्याचा परिणाम होणार होता. परंतु, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही एक्सप्रेस मार्ग बदलून धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Insurance No Fuel Rule : विमा नाही तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; काय आहे 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल’ नियम?

Olympic Dream: ...अन् डी. वाय. दादांची ऑलिंपिकवारी चुकली; खाशाबांसोबतच्या लढतीच्या आठवणीला उजाळा

Chandipura Virus : गुजरातमध्ये २२ मुलांचा मृत्यू , आधी ताप अन् मग बेशुद्ध... चंडीपुरा व्हायरसची काय आहेत लक्षणे?

DY Patil Death News : डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता अंतिम संस्कार; राहुल गांधी, खर्गे, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज; कोयना, अलमट्टीतून विसर्ग वाढला

SCROLL FOR NEXT