Nanded Pre monsoon rains loss bananas farm sakal
नांदेड

नांदेड : माॅन्सूनपूर्व पावसाचा केळीला फटका

भोकर मंडळात ३१ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील बामणी शिवारात केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. हा पाऊस भोकर मंडळात ३१ मिलीमीटर झाल्याने शेतात पाणी साचले होते.

अर्धापूर तालुक्यातील बामणी शिवारात बुधवारी रात्री काही भागात वादळी वाऱ्यांसह पावसाचा फटका शेतीला बसला. कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढल्या आहेत. तालुक्यातील बामणी शिवारात संतोष बडायल्या, अशोक देलमडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागाला फटका बसला. काही ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडली आहेत.

पंधरा दिवसावर काढणीस आलेल्या केळीची झाडे पडल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. हा पाऊस भोकर मंडळात ३१ मिलीमीटर झाला. या पावसामुळे शिवारात पाण्याचे तळे तयार झाले होते. जिल्ह्यात इतर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकरी पेरणीपूर्व कामांना गती देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT