file photo
file photo 
नांदेड

नांदेड : रब्बीच्या तयारीसाठी पऱ्हाटी काढून गव्हाच्या पेरणीची तयारी

जितेश जाधव

आष्टा (ता. माहूर) : यावर्षी खरीप हंगामातील विविध पिकांवर रोगराई, सततच्या पावसानंतर कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, पहिल्या वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीचे संकट दिसून येत असल्याने आष्टा परिसरातील मं पार्डी, बंजारातांडा, आसोली, मेठ, उमरा, हिवळणी, नखेगाव, वडसा, टाकळी, मुरली, लकमापुर, लींबायत, मालवाडा, लांजी, शेकापुर, केरोळी शेतकऱ्यांवर उपट पऱ्हाटी पेर गहू म्हणण्याची वेळ आली आहे.

यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. मुग व उडिदाच्या पिकांचे पावसाने तीन तेरा वाजविल्याने लागलेला खर्चसुद्धा वसूल झाला नाही. शेतकऱ्यांच्या  संपूर्ण आशा कपाशीच्या पिकावर केंद्रित झाल्या होत्या. मूग उडीदाच्या पीकांचे झालेले नुकसान कपाशीच्या पिकांच्या माध्यमातून वसूल करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कपाशीच्या पिकावर वारेमाप खर्च केला. परंतु कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडआळीचा प्रदूर्भाव दिसून येत असल्याने कपाशीचे पीक देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा उत्पादन देणार नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यावर निर्माण झाली आहे. चांगल्या दिसणाऱ्या कपाशीच्या बोंडामध्ये बोंडआळी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर केलेला खर्च सुद्धा भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पऱ्हाटी उपटून टाकण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांचेवर गहू, हरभरा पेरण्याची वेळ आली आहे.

प्रतिक्रिया
यावर्षी कपाशीवर केलेला खर्च देखील विविध संकटामुळे भरून निघणार नसल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे या आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई द्यावी.
- किसन मोरे, शेतकरी लींबायत

सततच्या पावसामुळे आधी पराटीच्या पात्याची नूकसान झाली असून आता बोंडामध्ये रुपांतर झालेल्या बोंडाना आता बोंडअळीचे मोठे संकट आले आहे.पाच एकरमध्ये फक्त १५ क्विंटल कापूस निघाले असून बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव थांबता थांबेना. एका वेचणीतच आठ ते नऊ फुट असलेली पराटी आम्हा शेतकर्‍यांना उपटून फेकण्याची वेळ आली आहे. तरी माय बाप सरकारने झालेल्या नूकसानीचे भरपाई द्यावी.
- अंबादास राजुरकर, प्रगतशिल शेतकरी वाई बा.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT