Surgery sakal
नांदेड

Nanded : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; बॅटऱ्यांच्या प्रकाशात करावी लागली शस्त्रक्रिया

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी बुधवारी पेचप्रसंग निर्माण झाला

सकाळ वृत्तसेवा

तामसा (जि. नांदेड) : वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी बुधवारी पेचप्रसंग निर्माण झाला. केंद्राच्या यंत्रणेने त्यावर मात चक्क बॅटऱ्यांच्या प्रकाशावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी केंद्रात मंगळवारी (ता.३ ) १७ महिला दाखल झाल्या होत्या. आज सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन होते. मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काल मध्यरात्रीपासून तामसा शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पेच उद्‍भवला. विजेशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.

वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड, डॉ. दीपक कदम यांनी शस्त्रक्रियांसाठी पर्यायी उपायांबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्याकडे संपर्क साधला. महिला व त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत. चार बॅटऱ्या उपलब्ध करून त्यांच्या प्रकाशझोतात शस्त्रक्रिया केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची गुप्त बैठक कॅमेऱ्यात; पहिला फोटो होताच राजकीय वर्तुळात खळबळ, मास्टरमाईंडही समोर

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

MSEB Share Market : महावितरण शेअर मार्केटमध्ये येणार, खासगीकरणाकडे वाटचाल; राज्य सरकारचा प्रस्ताव, आयपीओ ओपन करण्यावरून नवा वाद

IPL 2027 Trade: रिषभ पंतला पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आणण्यात 'दोन' मोठ्या व्यक्तींचा हात; KKR ही होते मैदानात, पण LSGच्या हट्टामुळे Deal फिसकटली

BEST Strike : मुंबईकरांचे हाल... बेस्ट संप दुसऱ्या दिवशीही सुरूच; मेट्रो, रेल्वेत गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT