Nanded  sakal
नांदेड

Nanded : चुकीच्या दिशादर्शक फलकाने खासगी बसला अपघात

५५ प्रवासी बालंबाल बचावले ; तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

मरखेल : राष्ट्रीय महामार्ग १६१ -अ वरील पुलांचे काम न करता दाखविण्यात आलेल्या चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे बंगळुरूहून नेपाळकडे निघालेल्या मजुरांची खासगी बस पुलाजवळ कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून, यातील एकास गंभीर मार लागल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून आपले मूळ गाव गाठण्याचे लक्ष ठेवलेल्या ५५ प्रवाशांचे प्राण बालंबाल बचावले. ही घटना तुंबरपल्ली- हंगरगा (मुखेड) जोडणाऱ्या पडक्या पुलावर घडली. या गंभीर अपघातास जबाबदार महामार्गाचे काम करणाऱ्या अजयदीप कन्स्ट्रक्शनवर कार्यवाहीची मागणी केली जात आहे.

नेपाळमधील सुर्खद, घोडाघोडी नगरपालिका (कैलाली) येथील मजुरवर्ग पोटाची खळगी भरण्यासाठी बंगळुरू (कर्नाटक) या ठिकाणी कामावर आहेत. यातील दीपक खंम्बा बिष्ट (रा. घोडाघोडी, नेपाळ) यांच्यासह जवळपास ५५ मजूर आपल्या गावी जाण्यासाठी बंगळुरूहून मनकामना सागरमाथा टूर्स कंपनीच्या खाजगी प्रवासी बस (क्र. एन. एल. ०१ बी १७९५) गुरुवारी (ता.तीन) रोजी रात्रीच्या सुमारास निघाले होते. शुक्रवारी (ता.चार) रोजी औराद (कर्नाटक) या ठिकाणाहून पुढच्या दिशेने प्रवास करीत असताना हणेगाव याठिकाणी लावण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील फलकाचा आधार घेत नांदेडकडे फलकाच्या दिशेने गाडी वळविली. या महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून, ठिकठिकाणी अर्धवट रस्ते, पुलांचे बांधकाम झालेले नाही.

सदरचे वाहन रात्री दहाच्या सुमारास वाहनधारकाचा ताबा सुटून देगलूर- मुखेड तालुक्याच्या सीमा जोडणाऱ्या तुंबरपल्ली नाल्यावरील पडक्या पुलावर मातीच्या ढिगाऱ्यावर आदळले. या अपघातात नेपाळ देशातील रहिवासी असलेल्या प्रचंड जयपाल जापराल, ललित नवीन पन्याल, अंजु जोशी या तिघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून, बसमधील ५५ प्रवासी वाहनाचे काच फोडून कसेबसे बाहेर निघाले. यापूर्वीही असाच अपघात या रस्त्यावर झाला होता. याप्रकरणी दीपक बिष्ट यांच्या फिर्यादीवरून वाहनचालकाविरुद्ध मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास जमादार अब्दुल बारी हे करीत आहेत.

पोलिसांनी दाखविली माणुसकी

घटनेची माहिती कळताच मरखेल पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, उपनिरीक्षक मधुकर जायभाये, पोलिस कर्मचारी चंद्रकांत पांढरे, ग्यानोबा केंद्रे आदींनी घटनास्थळ गाठत या मजुरांना पोलिस ठाण्यात आणून त्यांना राहण्याची व जेवणाची सोय करीत माणुसकी दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

SCROLL FOR NEXT