file photo 
नांदेड

नांदेड : पिककर्ज वाटपाचे प्रमाण कमीच, जिल्ह्यात ३५ टक्के कर्ज वाटप

अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन हजार ३१ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बॅंकांना दिले आहे. असे असताना जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत केवळ १५ टक्केच पिक कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ जिल्हा बॅंकेने १४४ टक्के व ग्रामिण बॅंकने ७५ पिककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बॅंकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ३१ कोटी तर रब्बीसाठी ५०७ कोटी असे एकूण दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. यंदा शेतकऱ्यांची पिककर्ज झाल्याने कर्जमागणी करणाऱ्यांचे प्रमाण अधीक आहे. तर कोरोना विषाणूच्या उपाययोजनेत लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये अडकल्याने पिककर्ज वाटपाचे काम ठप्प होते. यामुळे पिककर्ज वाटपाचे प्रमाण कमी असल्याचे बॅंकांचे म्हणने आहे.

जिल्ह्यात २६ हजार ८८७ खातेदारांना २२७ कोटी ६७ लाखांचे कर्ज वाटप

पिककर्ज माफीसाठी पात्र ठरलेल्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग झाल्यानंतर त्या खात्याला नव्याने कर्ज मिळेल, अशा विचारात असलेल्या शेतकऱ्यांना मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकेने कर्ज वाटल केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आजपर्यंत जिल्ह्यात २६ हजार ८८७ खातेदारांना २२७ कोटी ६७ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून ५५ हजार ४५९ शेतकऱ्यांना दोन २६८ कोटी ३५ लाख तर महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेने ३३ हजार ८५३ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाखांचे कर्ज वाटल केले आहे. जिल्ह्यात ३५ टक्क्यानुसार आजपर्यंत खरिपासाठी एकूण एक लाख १६ हजार १९९ शेतकऱ्यांना ७१२ कोटी ५६९ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.

दरम्यान मागील कर्जमाफी चार वर्षाची 

सप्टेंबर महिना चालू असल्याने शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज मिळेल की नाही अशी भिती व्यक्त होत आहे. दरम्यान मागील कर्जमाफी चार वर्षाची आहे. यामुळे यंदा कर्जमागणी करणारे जास्त आहे. तसेच बॅंकांना पैसेही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आले. यामुळे कर्ज वाटपाचे प्रमाण कमी वाटप आहे. पात्र शेतकऱ्यांना खरिप, रब्बी अथवा उन्हाळा कोणत्याही हंगामात पिककर्ज घेता येइल, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक गणेश पाठारे यांनी दिली. 

शेतकऱ्यांनी काळजी करु नये

ज्यांना कर्ज मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना पुढील काळात कर्ज मिळेल. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करु नये.
- गणेश पाठारे, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, नांदेड. 

संपादन -  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT