file photo 
नांदेड

नांदेड : निरोगी आयुष्‍यासाठी नियमित शौचालयाचा वापर आवश्‍यक- मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

प्रल्हाद कांबळे

नांदेड - आरोग्‍य संपन्‍न जीवन जगण्‍यासाठी जशी उत्‍तम आहाराची गरज आहे. तसेच स्‍वच्‍छ वातावरणाची देखील आवश्‍यकता आहे. निसर्गाने आपल्‍याला स्‍वच्‍छ पाणी, स्‍वच्‍छ हवा व स्‍वच्‍छ अन्‍नधान्‍य दिले असले तरी मानवाच्‍या उघडया शौचविधीमुळे हवा, पाणी व अन्‍नधान्‍य दूषित होत आहे आणि पावसाच्‍या पडणा-या पाण्‍यात ही मैला मिसळली गेल्‍यामुळे त्‍याचे अनेक दुष्‍परिणाम होत असतात. उघडया हागणदारीमुळे देखील वातावरणात दूर्गंधी पसरुन अनेक आजाराला आपण निमंत्रण देत आहोत. निरोगी राहण्‍यासाठी नागरिकांनी नियमित शौचालयाचा वापर करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले आहे.

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त आज गुरुवार (ता. १९)  नोव्‍हेंबर रोजी जिल्‍ह्यातील सर्व गावांमधून स्‍वच्‍छतेचे उपक्रम राबविण्‍यात आले आहेत. नांदेड तालुक्‍यातील चिमेगाव येथे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शौचालयाची पाहणी करुन गावक-यांशी संवाद साधला, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी गट विकास अधिकारी राजू तोटावाड, सहाय्यक गट विकास अधिकारी अनिता सरोदे आदींची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, संयुक्‍त राष्‍ट्रसंघातर्फे ता. १९ नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक शोचालय दिन म्‍हणून जाहीर केला आहे. त्‍यानिमित्‍त सर्वत्र स्‍वच्‍छतेचे महत्‍व पटवून देण्‍यात येत आहे. आज कित्‍येक स्‍त्री-पुरुष उघडयावर शौचास बसतात ही लाजिरवाणी बाब आहे. उघडयावरील शौचविधीमुळे मोठया प्रमाणात रोगराई पसरते. महिलांचीही मोठी कुचंबना होते. त्‍यासाठी प्रत्‍येकाकडे शौचालय असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. नुसते शौचालय असून चालणार नाही तर त्‍याचा नियमित वापर केल्‍यास गावे रोगमुक्‍त, दुर्गंधीमुक्‍त होतील. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर मास्‍कचा वापर, दोन व्‍यक्‍तींमधील सुरक्षित आंतर व नियमित हात धुणे या त्रिसुत्रिचा वापर करावा, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

यावेळी शौचालय वापराबाबत गृहभेटी करुन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी महिलांशी संवाद साधला. शाळेतील स्‍वच्‍छता संकुलाची पाहणी करुन पाण्‍याच्‍या टाकीला नळ जोडणी करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. जल शुध्‍दीकरण प्‍लांटलाही भेट दिली. यावेळी त्‍यांनी शालेय विद्यार्थ्‍यांना गृहभेटीतून संवाद साधला. प्रारंभी माजी पंतप्रधान स्‍वर्गीय इंदीरा गांधी व झासीची राणी लक्ष्‍मीबाई यांच्‍या प्रतिमेचे पुजन करण्‍यात आले. त्‍यानंतर उपस्थितांना स्‍वच्‍छतेची शपथ देण्‍यात आली. यावेळी विस्‍तार अधिकारी दिलीप बच्‍चेवार, सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्‍यवहारे, नंदलाल लोकडे, महेंद्र वाठोरे, कृष्‍णा गोपिवार, ग्रामसेवक व्‍ही.एम. बोंडावार, गट समन्‍वयक चंद्रमुनी कांबळे यांच्‍यासह ग्रामस्‍थांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: निवडणुकीआधी काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक! मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; बेस्टच्या कायापालटासाठी मांडली ठोस योजना

Nashik Cyber Fraud : सावधान नाशिककर! वर्षभरात सायबर भामट्यांनी मारला ५७ कोटींवर डल्ला; शेअर मार्केटच्या नावाने सर्वाधिक लूट

UPI Payment Tips : UPI पेमेंट करताना सावध! या सुरक्षा टिप्स दुर्लक्ष केल्यास खातं होऊ शकतं रिकामं!

Blue Drum : चर्चेतील मेरठ हत्याप्रकरणावर आधारित डॉक्यू-सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Motorola Viral News : मोटोरोला मोबाईल ब्लास्टवर कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT