file photo 
नांदेड

नांदेड : सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी झाले उपसरपंच; गावातील समस्या सोडविण्यासाठी घेतला पुढाकार

विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड) : बिलोली तालुक्यातील कोंडलापूर- नाग्यापूर- सुलतानपूर या तीन गावच्या गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीमा संदीप शिलगिरे यांची निवड झाली तर उपसरपंच पदाची धुरा नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी किशन पिराजीराव सोने यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर गावातील समस्या सोडविण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

बिलोली तालुक्यात तीन गावची गट ग्रामपंचायत असलेल्या कोंडलापूर- नाग्यापूर- सुलतानपूरचा मागील अनेक वर्षापासून म्हणावा तेवढा विकास झाला नाही. तीन- चार किलोमीटरच्या अंतरावर विभागून असलेल्या या तीन गावांमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य विभागले गेलेले असल्याने गावच्या विकासासाठी येणारा निधी नेमका कोणत्या गावात खर्च करायचा यावरुन अनेक वेळेला किरकोळ वादाचे विषय निर्माण होत असत.

सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी 

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांनी सत्तांतर घडवून आणले. त्यानंतर झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये गावातील लोकांनी नुकतेच सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी किशन पिराजीराव सोने या अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या कामावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे उपसरपंच पदाची जबाबदारी सोपविली. सरपंचपदी सिमा शिरगिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाचे अनुभवाची शिदोरी 

आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये तेहतीस वर्ष सेवा करुन निवृत्त झालेले शिक्षणाधिकारी किशनराव सोने यांनी गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असून आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाचे अनुभवाची शिदोरी स्वतः च्या गावासह तालुक्यातील अनेक गावात देवून सत्कार्य करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. गट पंचायत असलेल्या तिन्ही गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन भावी पिढी चांगल्या पद्धतीने सुसंस्कारीत पणे घडविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT