Nanded samadhan resort Opening ashok chavan 
नांदेड

Nanded : आता गुवाहाटीला जायची गरज नाही ; अशोक चव्हाण

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण; ‘समाधान’ रिसॉर्टचा कृष्णुरला शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : काय ती झाडी...काय ते डोंगार...काय ते हॉटेल...सगळं कसं ओके....असे म्हणत काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील काही जण गुवाहटीला गेले होते. परंतू कृष्णुर परिसरात कंठेवाड परिवाराने सुरू केलेल्या समाधान रिसॉर्टच्या मागेपुढे पाहिले तर असेच चित्र दिसून येते. असाच येथील निसर्ग रम्य परिसर झाला आहे. त्यामुळे आता कुठल्याही समारंभासाठी अथवा सहलीसाठी गुवाहटीला जाण्याची गरज राहिली नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

नांदेड - हैदराबाद रस्त्यावर नायगाव तालुक्यातील कृष्णूर एमआयडीसी येथे ‘समाधान’ रिसॉर्ट निर्माण करण्यात आले असून त्याचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता. २३) करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी ही मिश्किल टिप्पण्णी केली.

या सोहळ्यास माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, गंगाराम ठक्करवाड, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, बबन बारसे, दिलीपराव धर्माधिकारी, माजी सभापती अमितसिंह तेहरा, संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड, लता कंठेवाड, मारोती कंठेवाड, सविता कंठेवाड, बालाजी कंठेवाड, शर्मिला कंठेवाड, गजानन पाटील मुधोळ, विसावा ग्रुपचे बालाजी इबितदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले की, प्रत्येकाची वैचारिक भूमिका वेगळी असते. परंतू विकासकामे मार्गी लागण्यासाठी अशी भूमिका बाजूला ठेवणे आवश्यक आहे. मी स्वतः विकास कामासाठी अनेक विरोधकांशी जुळवून घेत आहे. इतरांनीही विकास कामात अडथळे न करता एकत्र यावे. महा विकास आघाडी सरकारच्या काळात सहकारी मंत्र्यांच्या जिल्ह्यातील अनेक विकास कामाला चालना दिली.

आता त्या मंत्र्यांनी जाणीव ठेऊन नांदेडच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर नांदेडवासियांना बाहेरच्या शहरात जाण्याची गरज उरली नाही. कृष्णूर येथे निर्माण करण्यात आलेल्या समाधान रिसॉर्टमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक बालाजी इबितदार यांनी केले. सुत्रसंचालन पुप्पलवाड यांनी केले. माजी सभापती सविता कंठेवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT