file photo 
नांदेड

नांदेड : उमरखेडमधील ढाणकी येथे ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी- खासदार हेमंत पाटील

प्रल्हाद कांबळे

नांदेड : उमरखेड तालुक्यातील "ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन सुधारणा करण्यात येईल." खासदार हेमंत पाटील यांच्या या आश्वासनाची वचनपूर्ती  झाली असून ढाणकी येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे . लवकरच याबाबतची सर्व प्रशासकीय  कार्यवाही पूर्ण करून जनतेच्या सेवेत रुग्णालय रुजू होईल. 

कदाचित दहा महिन्यापूर्वी दिलेले वचन आणि भाषण ढाणकीमधील स्थानिक विसरले असतील, मात्र खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या शब्दाला जागून वचनाची पूर्ती केली आहे. मागील वर्षी  डिसेंबर महिन्यात ढाणकी नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक पार पडली होती. नगरपंचायतीची स्थापना झाल्यांनतर पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती, त्यामुळे मातब्बर राजकीय  पक्षांनी  प्रतिष्ठा पणाला लावली होती. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी झाल्या. नगर पंचायतीची प्रशासन व्यवस्था सुरळीत सुरु झाली आणि सत्तारूढ पक्षाने दिलेले वचन हवेत विरले, परंतु खासदार हेमंत पाटील यांनी जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्याच्या उद्देशाने सातत्याने ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव पुढे करून मुख्यमंत्री आणि राज्याच्या आरोग्य  विभागाकडून मंजूर करून घेतला.

हेही वाचानांदेडचा जखमी लांडगा उपचारासाठी नागपुरात

मतदार संघातील जनतेला उत्तम दर्जाची आरोग्यसुविधा मिळावी याकरिता खासदार हेमंत पाटील सदैव जागरूक असतात सर्व सामान्य जनतेला आरोग्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा खासदार पाटील यांनी उभी केली आहे,आरोग्यदूत सदैव जनतेच्या सेवेत रुजू असतात यामाध्यमातून आजवर अनेकांना मदत झाली आहे, अनेकांनी आभार व्यक्त केले आहेत. त्यामुळेच  ढाणकीच्या ग्रामीण रुग्णालयांचा बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन खासदार हेमंत पाटील यांनी ३० खाटांचे ग्रामीण  रुग्णालय मंजूर करून आणले.यामुळे ढाणकी आणि आजूबाजूच्या परिसरातील ३०-३५ गावांना याचा लाभ होणार आहे .

ग्रामीण रुग्णालयात सर्व  अत्याधुनिक सोयी सुविधा रुग्णाना मिळतील जेणेकरून रुग्णांचा नांदेड ,यवतमाळ ,उमरखेड येथे जाण्यासाठी लागणारा आर्थिक खर्च कमी होईल आणि अत्यल्प दारात आरोग्य सुविधा मिळतील. हेमंत पाटील यांनी दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे याभागातील जनतेने खासदार पाटील यांच्या कामाचे कौतुक करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार  मानले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT