crime
crime sakal
नांदेड

नांदेड : पिस्तूलसह दोघांना सरसम येथे अटक

सकाळ वृत्तसेवा

हिमायतनगर : नांदेड पाठोपाठ आता ग्रामीण परिसरात सुद्धा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील दोन युवकाकडून दोन गावठी कट्टे येथील स्थानिक पोलिसांनी जप्त केले असून कट्टे जप्त करण्याची तालुक्यातील हि पहिल्याच कारवाई आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली.

नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिलेल्या सूचनेनंतर हिमायतनगर शहर व परिसरात पोलिस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त सुरु आहे. दरम्यान हगस्तीच्या कामात असलेले एपीआय नंदलाल चौधरी यांच्या पथकाने सरसम येथे जाऊन अत्यंत गोपनीय पद्धतीने निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यां दोघांना ताब्यात घेतले. अगोदर निखील देशमुख याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आढळून आले.

चौकशीअंती हे पिस्टल अवैद्य असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी अन्य साहित्य जप्त करून या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (ता.२२) जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्‍यातील सरसम येथे करण्यात आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्‍यातील मौजे सरसम येथील संशयित निखिल संदीप देशमुख (वय २४) आणि विकास दत्ता ताडेबाड (वय २०) हे दोघेजण विनापरवाना स्वतःजवळ पिस्तुल बाळगून परिसरात दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती हिमायतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भुसनुर यांना मिळाली होती.

यावरून त्यांनी आपले सहकारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नंदलाल चौधरी यांना सूचना केली. यावरून सहायक पोलिस निरीक्षक नंदलाल यांनी, पोलिस कोमल कागणे, पवन चौदंते, जिंकलवाड आणि कुलकर्णी यांना सोबत घेऊन कार्यवाही केली. यात हत्यारासह दोघांना अटक केली आहे. याबाबत नंदलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून निखिल देशमुख आणि विकास ताडेवाड यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलिस हवालदार कोमल कागणे या करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT