file photo
file photo 
नांदेड

नांदेड : बाराशे भक्तांना स्वखर्चाने सचखंड गुरुद्वारा दर्शन घडवणारा अवलिया- सरदार विक्रमसिंघ संधू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : बाराशे भक्तांना स्वखर्चाने नांदेड येथील जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घडवणारी यात्रा मुंबईतील एक उद्योगपती तथा समाजसेवी सरदार विक्रमसिंघ संधू यांनी घडवून आणली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. संत बाबा बलविंदरसिंग आणि संत बाबा नरेंद्रसिंग कारसेवावाले यांनी कौतुक आशीर्वाद देऊन कौतुक केले.

नांदेड येथे येऊन श्री गुरु गोविंदसिंघ महाराज यांच्या पावन भूमीत येऊन नविन वर्षाचे स्वागत करावे अशी मनोभावना अनेकांची असते. ती प्रत्येकाला साध्य करणे शक्य होत नाही. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत राहून समाजसेवा करणारे सरदार विक्रमसिंघ संधू यांनी पुढाकार घेतला. आणि मुंबई ते नांदेड अशी सहल आयोजित केली. मुंबई व परिसरात राहणाऱ्या भाविकांना एकत्रित करुन ते नांदेडला घेऊन आले. यात्रेत शीख समुदायसह सर्वच पंथातील मंडळीना सहभागी करुन घेतले. सुमारे एक हजार २०० जण या सेवाभावी यात्रेत सहभागी झाले आहेत. 

सरदार संधू हे युरोप देशात मोठे हॉटेल व्यावसायीक आहेत. सामाजिक व आध्यत्मिक सेवेत त्यांना रस आहे म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. असे त्यांनी सांगितले. वर्षभरात दोन वेळा ही यात्रा गरजवंताला घडवून आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा लंगर साहिबचे मौजुदा मुखी संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांनी संधू यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिला. यात्रा यशस्वी होण्यासाठी त्यांना इम्रान अंधेरीवाले, लतीफ चौहान, राफत हुसेन, जुबेर बलोच, मैनोंदींन शेख, समीर दायतर यांनी सहकार्य केले आहे. सुमारे बाराशे लोकांचा संपूर्ण खर्च ते स्वतः करत आहेत. १२ बसेस व रेल्वेनी ही दर्शन यात्रा त्यांनी आयोजित केली. त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत नानक साई फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी सत्कार केला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT