mseb
mseb 
नांदेड

नांदेड : सरपंच दत्ता पाटील पांगरीकर हे धावले महावितरणच्या मदतीला; एक लाख रुपये भरत वीज बिल केले कोरे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शेतकऱ्यांच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्याच्या हेतूने महा कृषी ऊर्जा अभियानच्या माध्यमातून कृषी पंप धारकांना सुवर्णसंधी चालून आलेली आहे. गावोगाव बैठका घेऊन अभियानाचा केलेला प्रचार कामी येत असून शेतकऱ्यांसह आता लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. पांगरी गावचे विद्यमान सरपंच दत्ता पाटील यांनी एक लाख रुपयाचे बिल भरुन थकबाकी कोरी केली आहे.

नांदेड ग्रामीण विभागा अंतर्गत येणाऱ्या लहान शाखेतील पांगरी गावचे विद्यमान सरपंच दत्ता पाटील पांगरीकर यांनी थकबाकीमुक्त होण्याच्या दृष्टिने विलंब आकार व व्याज माफीचा फायदा घेत एक लाख रुपयांचा वीजबील भरणा केला आहे. सोबतच मारोती भोजाजी दुधाटे यांनीही २५ हजार रुपये वीजबील भरत महाकृषि ऊर्जा अभियानाचा फायदा घेत आपले वीज बील कोरे केले आहे. याप्रसंगी कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी दोघांचाही हार घालून सत्कार केला. यावेळी सत्कार प्रसंगी सरपंच दत्ता पाटील यांनी महाकृषि ऊर्जा अभियानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देवून अख्खे गाव कृषीपंपाच्या थकबाकीतून मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर तसेच नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे हे महाकृषि ऊर्जा अभियान २०२० यशश्वी करण्याच्या दृष्टीने कार्यरत असून थकबाकीदार असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अभियान पोहचवण्यासाठी सर्व अभियंते व जनमित्रांनी सातत्याने प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. पांगरी गावातील शेतकऱ्यांनी अभियानात सहभागी व्हावे यासाठी कनिष्ठ अभियंता विलास कानोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

अनेक वर्षापासून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महाकृषि ऊर्जा अभियान २०२० हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. या अभियानात वीज जोडणी सोबतच कृषिपंपाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. निर्लेखानंतरचे विलंब आकार व व्याजाच्या माफीनंतर केवळ पन्नास टक्केच वीज बील भरावयाचे आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा.
- आर. पी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, नांदेड ग्रामीण विभाग
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT